शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

महापालिकेकडे दोन महिन्यांत साडेपाच हजार तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 18:43 IST

एनएमसी ई-कनेक्ट : तक्रारी सोडविण्याचे प्रमाण ९४ टक्के

ठळक मुद्देअ‍ॅपवर प्राप्त ५५२६ तक्रारींपैकी ५१९४ तक्रारींचा निपटरा तक्रारी सोडविण्याचे प्रमाण ९४ टक्के असल्याने अ‍ॅपवर तक्रारी मांडणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढते आहे

नाशिक - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जुने ‘स्मार्ट नाशिक’ अ‍ॅप बंद करुन दि. १ मार्च पासून नव्याने कार्यान्वित केलेल्या एनएमसी ई-कनेक्ट या मोबाईल अ‍ॅपवर दोन महिन्यांत तब्बल साडेपाच हजार तक्रारींचा पाऊस पडला आहे. अ‍ॅपवर प्राप्त ५५२६ तक्रारींपैकी ५१९४ तक्रारींचा निपटरा झाला असून ३३२ तक्रारी प्रलंबित आहेत. तक्रारी सोडविण्याचे प्रमाण ९४ टक्के असल्याने अ‍ॅपवर तक्रारी मांडणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढते आहे.आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबईच्या धर्तीवर एनएमसी ई-कनेक्ट हे मोबाईल अ‍ॅप १ मार्चपासून कार्यान्वित केले. या अ‍ॅपवर तक्रारी केल्यानंतर त्या सोडविण्यासंबंधीचा कालबद्ध कार्यक्रमही त्यांनी आखून दिला. शिवाय, धोरणात्मक बाबी वगळता अन्य तक्रारी तत्काळ सोडविण्यावर भर देण्यासंबंधीचे आदेश अधिकारीवर्गाला दिल्याने त्याचा एकूणच चांगला परिणाम दिसून येऊ लागला आहे. आतापर्यंत एनएमसी ई-कनेक्ट या अ‍ॅपवर ५५२६ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ५१९४ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. ३३२ तक्रारी प्रलंबित असून त्यात अतिक्रमण विभागाच्या सर्वाधिक ८६, विद्युत विभागाच्या ४६, भटके कुत्रे/मलेरिया २६, पाणीपुरवठा २५, बांधकाम विभाग २३, मलनि:स्सारण २०, उद्यान १७, नगररचना १५, पावसाळी गटार विभाग १२ या तक्रारींचा समावेश आहे. अ‍ॅपवर सर्वाधिक तक्रारी या विद्युत विभागाच्या ११८१ इतक्या प्राप्त झाल्या आहेत. त्याखालोखाल अतिक्रमण विभाग ७७९, घनकचरा व्यवस्थापन ७६२,पाणीपुरवठा ७०३, बांधकाम विभाग ५५९, भटके कुत्रे/मलेरिया ३९१, उद्यान ३३९, मलनि:स्सारण ३१५, पावसाळी गटार १५१ तर नगररचना विभागाच्या ९४ तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. आयुक्तांनी या अ‍ॅपवर येणा-या तक्रारी सोडविण्याकडे विशेष लक्ष केंद्रीत केले असल्याने आणि आयुक्तांकडून दर सोमवारी खातेप्रमुखांच्या होणा-या बैठकीत आढावा घेतला जात असल्याने तक्रारींचा निपटरा होण्याचे प्रमाण ९४ टक्के आहे. त्यामुळे, अ‍ॅपवर तक्रारी करण्याकडेही नागरिकांचा कल वाढत चालला आहे.६८ लोकांकडून अ‍ॅप डाऊनलोडशहरातील ६८ हजार नागरिकांनी एनएमसी ई-कनेक्ट हे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करुन घेतले आहे. यापूर्वी, अस्तित्वात असलेले स्मार्ट नाशिक अ‍ॅप हे ५२ हजार लोकांनी डाऊनलोड करुन घेतले होते. आता त्यात नागरिकांची हळूहळू भर पडत चालली आहे. प्रशासनाकडून नगरसेवकांनाही त्यांच्या तक्रारी अ‍ॅपवर मांडण्याचे आवाहन केले जात असल्याने अ‍ॅप हेच आता तक्रार सोडविण्याचे माध्यम बनू पाहत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे