नाशिक : भारताने अंतराळात खूप मोठी प्रगती केली आहे. अवकाश तंत्रज्ञानाच्या मदतीने जागतिक सुरक्षितता, नैसर्गिक धोके, भूकंप, सुनामी, हवामान आदीविषयी माहिती देणारे तंत्रज्ञान विकसित करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे, असे प्रतिपादन इस्रो अहमदाबादचे माजी चेअरमन ए. एस. किरणकुमार यांनी केले.मविप्र समाज संस्था, नाशिक व नॅशनल स्पेस सोसायटी (यूएसए) नाशिक इंडिया चॅप्टर नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक अंतराळ सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी ‘स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये भारताची यशोगाथा - काल, आज आणि उद्या’ या विषयावर आपले विचार मांडले.यावेळी संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, माणिकराव बोरस्ते, डॉ. प्रशांत देवरे, सचिन पिंगळे, अविनाश शिरोडे, डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी, डॉ. भाऊसाहेब मोरे, विजय बाविस्कर, डॉ. डी.डी. काजळे, डॉ. एन.एस. पाटील, प्रा. एस.के. शिंदे, सी.डी. शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्र आणि राज्य सरकारचा कारभार सुखकर करण्यासाठी इस्रोने आतापर्यंत २०० पेक्षा जास्त मोबाइल अॅप्स विकसित केले आहेत. आजच्या तरु ण पिढीने अवकाश संशोधनासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सूत्रसंचालन प्रा. तुषार पाटील व प्रा. कांचन बागुल यांनी केले. दुपारच्या सत्रात भारत व स्पेसची अंतराळातील वाटचाल मांडली.इस्रोच्या आतापर्यंत १६८ मोहिमाकिरणकुमार यांनी सांगितले की, देशाच्या प्रगतीसाठी आतापर्यंत इस्रोने १६८ मोहिमा केल्या असून, त्यापैकी ४५ यानांचे यशस्वीपणे प्रक्षेपण केले आहे. २०१७ मध्ये एकाच वेळी १०४ उपग्रह सोडून संपूर्ण जगाचे लक्ष वेधले. चांद्रयान १ व मंगल मोहीम यशस्वी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.
नजीकच्या काळात अंतराळ क्षेत्रात भारत पहिल्या स्थानावर : किरणकुमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 01:03 IST