शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीकडून सिडकोत गांधीगिरी;आरोग्याचा प्रश्न : नागरिकांना मास्कचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 16:11 IST

शहरात स्वाइन फ्लूसह साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी नाशिक महापालिकेतील आरोग्य विभाग अपयशी ठरला असून, स्वाइन फ्लूचे निर्मूलन करण्यासाठी महापालिका फक्त कागदी घोडे नाचवत आहे.

नाशिक : नाशिक महानगरपालिकेतील आरोग्य विभागाच्या उदासीनतेमुळे शहरात स्वाइन फ्लूने थैमान घातले असून, या रोगाला आळा घालण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सिडको विभागात नागरिकांना मास्कचे वाटप करून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.शहरात स्वाइन फ्लूसह साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी नाशिक महापालिकेतील आरोग्य विभाग अपयशी ठरला असून, स्वाइन फ्लूचे निर्मूलन करण्यासाठी महापालिका फक्त कागदी घोडे नाचवत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने महापालिकेतील आरोग्य विभागाला जाग आणण्यासाठी गांधीगिरी करीत शहरातील विविध भागात औषध फवारणी मोहीम राबविली आहे. परंतु अजूनही महापालिकेतील आरोग्य विभागाची झोप उडालेली नसून, आरोग्य विभाग ठोस पाऊल उचलताना दिसत नाही. शहरात दूषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे व या दूषित पिण्याच्या पाण्यामुळेही मलेरियाच्या आजारासह चिकुणगुण्यासारख्या आजारांनी डोके वर काढल्याचा आरोपही राष्टÑवादी कॉँग्रेसने केला आहे.नवरात्रोत्सव जवळ येत असून, नाशिकची ग्रामदेवता कालिका माता मंदिरात दरवर्षीप्रमाणे गर्दी होणार असून याकडेही महापालिका आरोग्य विभागाचे लक्ष नाही. महापालिकेने याकडे तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता असून, नागरिकांना रोगराईपासून वाचविण्यासाठी महापालिका आरोग्य विभाग जागे होत नाही तोपर्यंत असेच सामाजिक आरोग्याचे उपक्रम राबविणार असल्याचे युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले. याप्रसंगी अ‍ॅड. चिन्मय गाढे, अमोल नाईक, मुकेश शेवाळे, विशाल डोखे, हर्षल चव्हाण, संदीप चव्हाण, सुनील घुगे, विजय मटाले, हरीश महाजन, योगेश गांगुर्डे, मनोज हिरे, नीलेश सानप, अमोल तुपे आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक