शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

गंगापूरच्या जलपूजनाला राष्टÑवादीचा ‘वन्स मोअर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 01:24 IST

गंगापूर धरण पूर्ण भरल्याने देवळालीच्या आमदार सरोज अहिरे व माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी स्वतंत्र जलपूजन केल्याने धरणातील पाण्याला पुन्हा राजकीय रंग चढण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देधरण राजकारण : सरोज अहिरे, पिंगळे यांचा पुढाकार

नाशिक : गंगापूर धरण पूर्ण भरल्याने देवळालीच्या आमदार सरोज अहिरे व माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी स्वतंत्र जलपूजन केल्याने धरणातील पाण्याला पुन्हा राजकीय रंग चढण्याची चिन्हे आहेत.नाशिक शहरासह मराठवाड्याची तहान भागवणारे गंगापूर धरण ९५ टक्के भरल्यानंतर नाशिक महानगरपालिकेच्या वतीने महापौर सतीश कुलकर्णी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी गत महिन्यात जलपूजन केले होते. त्यानंतर शनिवारी राष्टÑवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांनी माजी खासदार देवीदास पिंगळे आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पदाधिकारी यांच्यासह स्थानिक शेतकऱ्यांना सोबत घेऊन शासकीय जलपूजन केल्याचा दावा केला आहे.धरणाचे काही पाणी आणि क्षेत्र देवळाली मतदारसंघात असूनसुद्धा स्थानिक शेतकºयांना आत्तापर्यंत पूजनाचा मान मिळालेला नाही. त्यामुळे जलसंपत्ती टिकवण्यासाठी शेतकºयांना सोबत घेऊन ही शासकीय पूजन करण्यात आल्याचे आमदार अहिरे यांनी सांगितले.गंगापूर धरणाचे दोनदा जलपूजन झाल्याने नाशिकसह मराठवाड्याची तहान भागवणाºया पाण्यावरून राजकारण झाले असल्याची चर्चा सुरू आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांना कळविण्यात आल्याचे अहिरे यांनी सांगितले. यावेळी नासाकाचे माजी चेअरमन मुरलीधर पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, मविप्र संचालक सचिन पिंगळे,पंचायत समिती सभापती विजयश्री कांडेकर, उपसभापती ढवळू फसाळे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकgangapur damगंगापूर धरणNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevidas Pingaleदेविदास पिंगळे