शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

नवीन बॅँक अधिभाराच्या विरोधात नाशकात राष्ट्रवादीचे निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 15:10 IST

नवीन बॅँकींग नियमावलीनुसार बॅँकेमध्ये पैसे भरणे, ठेवणे व काढणे अशा सर्वप्रकारच्या सेवांवर अतिरीक्त कर आकरणी करून ग्राहकांची आर्थिक पिळवणूक केली जारार आहे. चेक भरणे, पासबुक अपडेशन, फंड ट्रान्सफर आदी सेवा बॅँकाद्वारे मोफत पुरविणे व ग्राहकांना योग्य सेवा देणे हे सहकार चळवळीचे मुख्य उद्देश असताना

ठळक मुद्देचालू महिन्यापासून ग्राहकांना बॅँकेच्या प्रत्येक सेवेवर अतिरीक्त अधिभार गरिबांच्या खात्यावर डल्ला मारून सुमारे १७७१ कोटी रूपये कराच्या नावाने वसूल

नाशिक : सरकारने नवीन बॅँकींग नियमावलीला मान्यता दिल्यामुळे चालू महिन्यापासून ग्राहकांना बॅँकेच्या प्रत्येक सेवेवर अतिरीक्त अधिभार आकारण्यात येणार असल्याने त्याच्या विरोधात राष्ट्रवादी कॉग्रेसच्या ओबीसी सेलच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सरकारने बॅँक सेवांवर कर आकरणी करून सहकार चळवळ मोडीत काढून धंदेवाईक रूप दिल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.नवीन बॅँकींग नियमावलीनुसार बॅँकेमध्ये पैसे भरणे, ठेवणे व काढणे अशा सर्वप्रकारच्या सेवांवर अतिरीक्त कर आकरणी करून ग्राहकांची आर्थिक पिळवणूक केली जारार आहे. चेक भरणे, पासबुक अपडेशन, फंड ट्रान्सफर आदी सेवा बॅँकाद्वारे मोफत पुरविणे व ग्राहकांना योग्य सेवा देणे हे सहकार चळवळीचे मुख्य उद्देश असताना एस.बी.आय सारख्या बॅँकेने खात्यात पुरेसे शिल्लक नसल्याचे कारणे देवून अनेक विद्यार्थ्यांच्या, पेन्शानधारकांच्या तसेच गरिबांच्या खात्यावर डल्ला मारून सुमारे १७७१ कोटी रूपये कराच्या नावाने वसूल केले असून, एकीकडे शासन मुले शिकावी म्हणून त्यांना शिष्यवृत्ती देते, विधवा, अपंग, निराधार महिलांना सानुग्रह अनुदान देते. दुसरीकडे खात्यात पुरेशी शिल्लक नसल्याच्या कारणाने पैसे कट जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. बॅँकेच्या अतिरीक्त चार्जेसमधून बॅँकेचे कर्मचारी, डायमंड, प्लेटीनियम सारख्या ग्राहकांना वगळण्यात आल्याने बॅँका गरीब व श्रीमंती असा भेद निर्माण करीत असल्याने सदरची नियमावली तात्काळ रद्द करावी अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या आंदोलनात सुरेश आव्हाड, प्रकाश माळोदे, अरूण अभंग, अरविंद सोनवणे, नासिर पठाण, नामदेव गाडेकर, बाळासाहेब जाधव, मोहियोद्दीन शेख, शाम तावरे, लक्ष्णम सोनवणे, राजेश जाधव, प्रविण गाडेकर, सुरेखा पाठक, सत्यभामा भुजबळ, अनिता सोनवणे, विक्रम पाटील, सचिन बोरसे आदी सहभागी झाले होते.

 

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक