शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

चांदवडला राष्ट्रवादीने  रोखला महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 15:58 IST

रस्त्यावर ओतला कांदा : हमीभाव देण्यासह निर्यातबंदी उठविण्याची मागणी

ठळक मुद्देआंदोलनामुळे महामार्गावर दुतर्फा वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

चांदवड : कांदा पिकाला हमीभाव मिळावा आणि कांदा निर्यातबंदी त्वरित उठवावी या मागण्यांसाठी चांदवड तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने चांदवड येथील मुबंई-आग्रारोडवरील पेट्रोलपंप चौफुलीवर गुरुवारी (दि.५) दुपारी १२ वाजता रास्तारोको आंदोलन करत महामार्ग तासभर रोखून धरण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा ओतून देत निषेध नोंदविला शिवाय, नायब तहसीलदारांना कांद्याच्या माळा भेट देत प्रश्नाच्या गांभीर्याकडे लक्ष वेधले. या आंदोलनामुळे महामार्गावर दुतर्फा वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रविंद्र पगार, तालुकाध्यक्ष व जिल्हा परिेषदेचे उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड , कृषी समितीचे सभापती संजय बनकर, जिल्हा पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार एस.पी.भादेकर, पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या कांदा पिकाला हमी भाव द्यावा, निर्यातबंदी त्वरीत उठवावी या प्रमुख मागण्यांचा निवेदनात समावेश होता. यावेळी जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार यांनी आंदोलकांसमोर शेतकºयांच्या भावना व्यक्त केल्या. कांदा व अन्य शेतीमाल कवडीमोल भावाने विकला जात आहे. त्यामुळे शासनाने १५ मार्चची वाट न पाहता तातडीने निर्यात बंदी उठवावी, तसेच कांदा व अन्य शेतीमालाला तातडीने हमीभाव जाहीर करावा अशी मागणी पगार यांनी केली.हस्तक्षेप योजना राबवाभारतीय कांदयाबाबत केंद्र सरकारने निर्याती बाबतचे धोरण स्थिर नसल्याने कांद्याचे भाव कमी होत आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून उत्पादन खर्च देखील निघत नाही. सरकारने बाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला किमान २५०० रुपये हमी भाव जाहीर करावा अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली.

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा