शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
2
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
3
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
4
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
5
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
6
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
7
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
8
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
9
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
10
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
11
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
12
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
13
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
14
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
15
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
16
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
17
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
18
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
19
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
20
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नायगाव घाट बनला कचरा डेपो

By admin | Updated: January 11, 2017 00:10 IST

नायगाव घाट बनला कचरा डेपो

नायगाव : सिन्नर - सायखेडा रस्त्यावरील नायगाव घाट गेल्या अनेक दिवसांपासून माळेगाव औद्योगिक वसाहतीतील विविध कारखान्यांचा कचरा डेपो बनल्याचे चित्र आहे. थेट रस्त्यावर कचरा टाकण्यात येत असल्याने घाटाचे विद्रूपीकरण होण्यासह वाहतुकीसही अडथळा ठरत आहे.  माळेगाव एमआयडीसीतील विविध कंपन्यांकडून टाकावू वस्तू व कचरा नायगाव घाट परिसरातील टेकडीवर किंवा रस्त्याच्या कडेला सर्रासपणे टाकून दिला जात आहे. या कचऱ्याचे प्रमाणही मोठे राहत असल्यामुळे तो अनेकदा मोठ्या वाहनांमध्ये भरून आणला जातो. कधी हा कचरा पेटवून दिल्याने त्याची दुर्गंधी परिसरात पसरून प्रवाशांना नाक मुठीत धरून प्रवास करावा लागतो. या पेटविलेल्या कचऱ्यामुळे परिसरातल्या डोंगरावरील जनावरांचा चाराही  जळून खाक होण्याचे प्रकार घडले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून या दोन किलोमीटरच्या परिसरात कचरा टाकण्याच्या प्रकारात सातत्याने वाढ होत असल्याने घाटाच्या नैसर्गिक सौंदर्यास बाधा निर्माण होत आहे. संपूर्ण घाट हा हिरवाईने नटलेला डोंगराच्या कुशीत नागमोडी वळणे असलेला रस्ता आणि तळाशी असलेला जलाशय व परिसरातील हिरवीगार शेतशिवार यामुळे पर्यटकांना भुरळ घालतो. याशिवाय घाटातील महादेव मंदिरामुळे येथे भाविकांची वर्दळ असते. शनिवार-रविवार तर घाट परिसर हमखासपणे पर्यटकांनी गजबजून गेलेला दिसतो. गेल्या अनेक दिवसांपासून टाकण्यात येणाऱ्या ओल्या व सुक्या कचऱ्यामुळे घाटाच्या सौंदर्याला दृष्ट लागली आहे. घाटातील प्रत्येक वळणावर कचऱ्याचे ढिग दिसून येत आहेत.  कचऱ्याबरोबरच अनेक कारखान्यांतून अधून-मधून सोडण्यात येणाऱ्या दुर्गंधीयुक्त धुराने परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई करून घाट परिसरात दुर्गंधीमुक्त करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांसह प्रवाशांनी केली आहे. (वार्ताहर)