शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गाव समिती स्थापून कोरोनाविरूद्ध सरसावले नवीबेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 15:57 IST

कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही खबरदारीच्या उपाय योजना हाती घेतल्या जात आहेत. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील नवीबेज गावकऱ्यांनी कोरोनासाठी लढा देण्यासाठी गावपातळीवर कोरोना प्रतिबंध समिती स्थापन केली आहे. या प्रकारचा निर्णय घेणारे नवीबेज हे राज्यातील पहिलेच गाव मानले जात आहे.

ठळक मुद्देराज्यातील पहिलेच गाव : दंडात्मक कारवाईचा नियम

मनोज देवरेकळवण : कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही खबरदारीच्या उपाय योजना हाती घेतल्या जात आहेत. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील नवीबेज गावकऱ्यांनी कोरोनासाठी लढा देण्यासाठी गावपातळीवर कोरोना प्रतिबंध समिती स्थापन केली आहे. या प्रकारचा निर्णय घेणारे नवीबेज हे राज्यातील पहिलेच गाव मानले जात आहे.कोरोना प्रतिबंध समितीने नवीबेज गावकऱ्यांसाठी नियमावली तयार केली आहे. नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाई करून शंभर टक्के लॉकडाऊन करण्याचा निर्धार केला आहे. शिवाय बाहेरगावाहून आलेल्यांना घरातच बसण्याची सूचना करु न संपूर्ण गाव लॉकडाऊन केल्यामुळे गावात सर्वत्र शुकशुकाट आहे. याबाबत काल सोमवारी प्रगतशील शेतकरी घनश्याम पवार यांच्या अध्यक्षतेखाली नवीबेज ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत गाव शंभर टक्के लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. नवीबेज गावातून पुणे, मुंबई या सारख्या शहरात कामासाठी गेलेले गावकरी गावाकडे येत आहेत. गावात आलेल्या या गावकºयांची नोंद घेण्यात आली असून त्याची माहिती आरोग्य विभागाला देण्यात आली आहे. शिवाय घराबाहेर पडू नका अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे. या बैठकीत कोरोना प्रतिबंध समितीच्या अध्यक्षपदी घनश्याम पवार यांची निवड करण्यात आली. यावेळी सरपंच सखाराम गोधडे, उपसरपंच तथा मविप्र संचालक अशोक पवार, ग्रामपंचायत सदस्य, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील, व्यावसायिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

बैठकीत घेतले निर्णयगावक-यांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन नवीबेज कोरोना प्रतिबंध समितीने महत्वपूर्ण निर्णय घेतले असून त्यात ग्रामस्थांनी वारंवार हात धुणे, शिंकताना व खोकलताना तोंडाला रु माल, मास्क बांधणे, घरासमोर व दारासमोर साबण व पाण्याची बादली भरु न ठेवणे, बाहेरु न आल्यानंतर घरात जाण्यापूर्वी हात पाय तोंड साबणाने धुणे ,गावात अनावश्यक फिरू नये, गावात घोळका करु न बसू नये, आपापल्या घरात थांबवावे, घराची व परिसराची रोज साफसफाई करावी, सर्दी खोकला ताप आल्यास तात्काळ डॉक्टराना भेटावे, गावात बाहेरु न आलेल्या नागरिकांनी घरात थांबावे व कुटुंबातील व्यक्तीपासून दूर रहावे , भाजीपाला, किराणा, मेडिसन यांची योग्य दराने विक्र ी करतांना ग्राहकांनी वस्तू घेतांना सामाजिक अंतर ठेवावे, नियमांचे पालन केले नाही तर नियुक्त स्वयंसेवक दंडात्मक कारवाई करतील, सार्वजनिक जागेवर व ओट्यावर बसून गप्पा मारणे बंद करावे, गावात अवैध दारु विक्र ी बंद करावी असे निर्बंध लादण्यात आले आहेत. सूचना व नियमाचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य