शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
5
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
6
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
8
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
9
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
10
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
11
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
12
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
13
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
14
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
15
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
16
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
17
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
19
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
20
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक

‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे कोसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 00:42 IST

नाशिक : कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली. चक्रीवादळामुळे मंगळवारी (दि. २) रात्रीपासूनच जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाली होती. बुधवारी (दि. ३) दिवसभर कुठे जोरदार तर कुठे रिमझिम पाऊसधारा कोसळल्या. या पावसामुळे सप्तशृंगी गडावर दरड कोसळली.

नाशिक : कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली. चक्रीवादळामुळे मंगळवारी (दि. २) रात्रीपासूनच जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाली होती. बुधवारी (दि. ३) दिवसभर कुठे जोरदार तर कुठे रिमझिम पाऊसधारा कोसळल्या. या पावसामुळे सप्तशृंगी गडावर दरड कोसळली. कोरोनामुळे मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने मार्गावरील वाहतूकही बंद आहे. त्यामुळे सुदैवाने हानी झाली नाही. पावसामुळे शेतकऱ्यांनी उघड्यावर ठेवलेला कांदा भिजला तर शेतमाल वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळही उडाली होती. सप्तशृंग गडावर बुधवारी (दि. ३) सकाळच्या सुमारास दरड कोसळली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.नांदुरी ते सप्तशृंगगड दहा किलोमीटरचे अंतर असून, नांदुरीपासून पाच किलोमीटर अंतरावर गणपती घाट आहे. त्याठिकाणी सकाळी९ वाजेच्या दरम्यान दरड कोसळण्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. जेसीबीच्या साह्याने रस्त्यावरील अडथळे दूर करण्यात आले. सध्या कोरोनामुळे मंदिर दर्शनासाठी बंद आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद आहे. दरड कोसळण्याच्या घटनेमुळे सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.दरम्यान, निसर्ग चक्रीवादळाच्या संदर्भात प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांमुळे कोणतेही वाहन या कालावधीत नसल्याने दुर्दैवी घटना टळली. मोठ्या आकाराचे दगड दूर करण्यास प्रथमत: जेसीबीला अडचण आली. पाऊस व निसरड्या रस्त्यामुळे चालकाला तारेवरची कसरत करावी लागली. अर्धा ते पाऊण तासानंतर रस्ता पूर्ववत करण्यात आला.-------------------------दिंडोरीत भाजीबाजारात चिखलदिंडोरी : तालुक्यात ढगाळ वातावरण होत मंगळवारी रात्रीपासून अधूनमधून रिमझिम पाऊस सुरू असून, संभाव्य वादळाच्या भीतीने दिंडोरीतील बाजारपेठ दुपारी ३ वाजता बंद करण्यात आली. रिमझिम पावसामुळे सिडफार्मच्या जागेत भरणाºया भाजीपाला फळ बाजारात चिखल तयार होत व्यापारी व नागरिकांचे प्रचंड हाल झाले. सोमवारी सायंकाळी दिंडोरीच्या पश्चिम भागात वादळी वाºयासह जोरदार पावसाने हजेरी लावली होती. प्रशासनाने पुढील तीन चार दिवस वादळी वारा व मुसळधार पावसाचा इशारा देत नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन केले होते. मंगळवारी दुपारपासून वातावरणात बदल होत ढगाळ वातावरण झाले. रात्री काही काळ रिमझिम पाऊस झाला. बुधवारी ढगाळ वातावरण कायम राहत वाºयाचा वेग तुरळक वाढला व अधूनमधून रिमझिम पाऊस पडत होता. दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. दुपारी निसर्ग चक्र ीवादळ अलिबाग किनाºयालगत पोहचताच प्रशासनाने नागरिकांना सावधानतेचा इशारा देत दुकाने बंद करण्यास सांगितले. यावेळी ग्राहक व व्यावसायिकांची तारांबळ उडाली.-----------------------------मालेगावी पावसाची संततधारमालेगाव : शहर परिसरात बुधवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरू होती. दुपारनंतर वीजपुरवठा खंडित झाला; मात्र निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन यंत्रणा सज्ज असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला. पावसामुळे शहरातील विविध कॉलनी आणि वसाहतींचा परिसर जलमय झाला होता. दरम्यान, गुरुवारी (दि. ४) करण्यात येणारा पाणीपुरवठा वीजपुरवठा खंडित झाल्याने वेळेवर होऊ शकणार नाही अथवा शहरात पाणीपुरवठा करण्यात येणार नाही, असे आवाहन महापालिकेने केले.-----------------------------------गोदाकाठ भागात पाऊसधारासायखेडा : निसर्ग चक्रीवादळामुळे गोदाकाठ भागात सलग दोन दिवस रिमझिम पाऊस, जोराचा वारा सुटल्याने हवेमध्ये प्रचंड गारवा पसरला आहे. जोरदार वारा सुटल्याने म्हाळसाकोरे सबस्टेशन अंतर्गत येणाºया गावांमध्ये दिवसभर वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे पिण्याचे पाणी, जनावरांसाठी लागणारे पाणी मिळाले नाही. अनेक शेतकºयांना आपल्या विहिरींवर रहाटाच्या साह्याने पाणी ओढावे लागले. गोदाकाठ भागातील शेतकºयांची अचानक आलेल्या पावसाने आणि वाºयाने नागरिकांची धावपळ उडाली. शेतात उभा असलेला जनावरांचा हिरवा चारा भुईसपाट झाला तर बाहेर पडलेला कांदा पावसात भिजला. कोरोनाचे संकट उभे असताना चक्रीवादळाचे संकट उभे राहिल्याने नागरिकांनी धास्ती घेतली.-------------------------चांदवडला वाºयासह पाऊसचांदवड : शहर व परिसरात मंगळवारी (दि.२) रात्री साडेबारा वाजेपासून पावसास सुरुवात झाली. सकाळपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असला तरी गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेचे प्रमाण कमी झाले आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली असून, शेतकरी, नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार प्रदीप पाटील यांनी केले आहे. दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने उष्णतेबरोबर थंड वारे वाहताना दिसत होते.

टॅग्स :Nashikनाशिक