शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी-सेनेत काट्याची टक्कर

By admin | Updated: February 10, 2017 23:08 IST

महिला राज येणार : सभापतिपदासाठी गणांमध्ये वाढली चुरस

 नितीन बोरसे  सटाणाबागलाण तालुक्यातील वीरगाव गट व गण हे अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव झाल्याने येथे साहजिकच महिला राज येणार आहे. भाजपाचा हक्काचा हा गट गेल्या दशकापासून कॉँग्रेसच्या ताब्यात आहे. या निवडणुकीत शिवसेना, भाजपा, कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवाराने रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने येथे पंचरंगी सामना रंगण्याची चिन्ह दिसत असले तरी खरी लढत शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्येच दिसून येत आहे.वीरगाव गट, कंधाणे गण, वीरगाव गण या निवडणुकीत अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्याने अनेक मातब्बरांचा हिरमोड होऊन त्यांना सोयीस्कर गट शोधावा लागला आहे. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रा. अनिल पाटील हे या गटाचे नेतृत्व करत होते. हा गट राखीव झाल्याने प्रा. पाटील यांनी ठेंगोडा गटात पत्नी सारिका यांना उमेदवारी देऊन उतरविले आहे. हा गट तसा भाजपाचा बालेकिल्ला परंतु गेल्या दहा वर्षांपूर्वी कॉँग्रेसचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी सभापती यशवंत पाटील यांनी पत्नी संगीता यांना मैदानात उतरवून हा गट हस्तगत केला होता. गेल्या निवडणुकीतही कॉँग्रेसचे प्रा. पाटील यांनी हा गड राखला. या निवडणुकीत हा गट राखीव झाला असला तरी तिकिटासाठी अंतिम क्षणी अनेक राजकीय उलथापालथ झाल्याचे बघायला मिळाले. भाजपाने गेलेला गट मिळविण्यासाठी इलेक्टिव्ह मेरिटचा आग्रह धरून आदर्श गाव किकवारी खुर्दच्या सरपंच मंजुळाबाई कैलास जहागीरदार (सोनवणे) यांच्या नावाला पसंती दिली होती. मात्र ऐनवेळी दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी गट हस्तक्षेप करून जहागीरदार यांचे तिकीट कापून शिवसेनेच्या कार्यकर्त्या व खासदार चव्हाण यांची भाची साधना गवळी यांना उमेदवारी बहाल केली. चव्हाण यांच्या जातीय राजकारणामुळे सुमारे साडेचौदा हजार भिल्ल समाजाचे मतदार जहागीरदार यांचे तिकीट कापल्यामुळे नाराज झाल्याची सर्वत्र चर्चा आहे. तिकीट कापल्यामुळे जहागीरदार यांच्यासारखा मोठा उमेदवार शिवसेनेच्या गळाला लागला आहे. राष्ट्रवादी र्कांग्रेसमध्येही असेच महाभारत घडले. पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सदस्य वीरेश घोडे यांनी पत्नी वंदना यांना उमेदवारी मिळविण्यासाठी सुरुवातीला भाजपाकडून प्रयत्न केले; मात्र तेथे घोडेंची नाकाबंदी केल्याने त्यांनी तत्काळ राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत पुन्हा स्वगृही परतले आणि तिकिटासाठी दावेदारी केली; त्यांना ज्याची भीती होती तेच घडले. येथेही त्यांचे तिकीट कापून व्यक्तिगत दुश्मनी काढल्याचा घोडे यांचा आरोप आहे. राष्ट्रवादीने घोडे यांना उमेदवारी नाकारून जिल्हा परिषदेच्या विद्यमान सभापती व देवळ्याचे रहिवासी उषा बच्छाव यांना आयात करून उमेदवारी बहाल केली.