शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

राष्टवादीची मोठ्या आघाडीची अपेक्षा फोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 01:19 IST

लोकसभा निवडणुकीसाठी दिंडोरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे तालुक्यातील उमेदवार असल्याने अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीचे धनराज महाले यांना आघाडी मिळाली मात्र पन्नास हजारापेक्षा जास्त आघाडी मिळण्याच्या अपेक्षा फोल ठरल्या

लोकसभा निवडणुकीसाठी दिंडोरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे तालुक्यातील उमेदवार असल्याने अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीचे धनराज महाले यांना आघाडी मिळाली मात्र पन्नास हजारापेक्षा जास्त आघाडी मिळण्याच्या अपेक्षा फोल ठरल्या असून, भाजपच्या उमेदवार भारती पवार यांनी पूर्व भागात चांगली मते मिळवत आघाडी कमी केली तर माकपानेही दिंडोरीत चांगलीच मुसंडी मारली आहे.दिंडोरी लोकसभेत मोदी लाटेतही भाजप उमेदवाराला गेल्यावेळी चार हजाराच्या दरम्यान आघाडी मिळाली होती. यंदा शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले धनराज महाले यांना उमेदवारी दिल्याने व आमदार नरहरी झिरवाळ यांच्या मजबूत पकडीमुळे महाले यांना दिंडोरीतून मोठी आघाडी मिळण्याची अपेक्षा होती, मात्र माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी भाजपच्या उमेदवार पवार यांच्या प्रचाराची धुरा हाती घेत शिवसेना भाजपला खंबीर साथ दिल्याने राष्ट्रवादीचे मोठ्या आघाडीचे मनसुबे उधळले गेले. पेठ तालुका व दिंडोरीच्या पश्चिम भागाने महाले यांना मोठी साथ दिली; मात्र पूर्व भागात शिवसेना भाजपचा दबदबा कायम राहिला. माकपाने यावेळी दिंडोरी मतदारसंघातून आपली मते वाढवली तर वंचित बहुजन आघाडीलाही चांगली मते मिळाल्याने राष्ट्रवादीच्या अपेक्षित मताधिक्याचे स्वप्न भंगले. दिंडोरी मतदारसंघातील आदिवासी पट्ट्यात मोदी लाटेचा प्रभाव दिसला नाही. पूर्व भागात पुन्हा मोदींचा करिष्मा दिसून आला. डॉ. भारती पवार यांच्या विजयाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर भाजप व सेनेचे मनोबल वाढले आहे. प्रारंभीपासून नियोजनबद्ध प्रचार, सोशल मीडियाचा प्रभावी वापर, मतदारसंघात वर्चस्व व प्रभाव असलेल्या व्यक्ती व गट यांच्याशी संपर्क, याबरोबरच सासरे ए.टी. पवार यांचा राजकीय वारसा याचा भारती पवार यांना फायदा झाला आहे. मतदानाची वाढलेली टक्केवारीही पवार यांना विजयाच्या समीप घेऊन गेली. अंदाज चुकविणाऱ्या निकाला-मुळे धनराज महाले यांची राजकीय कारकीर्द पणाला लागली आहे.या निवडणुकीचा काय परिणामलोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार भारती पवार या विजयी झाल्याने दिंडोरी विधानसभेसाठी भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या आशा द्विगुणीत झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने दिंडोरी विधानसभेत आघाडी मिळवल्याने राष्ट्रवादीच्या गोटात काहीसे समाधान आहे. विधानसभेत काट्याची लढत होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. दिंडोरी विधानसभेत गेल्या तीन निवडणुकांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी व रामदास चारोस्कर यांच्या लढती रंगल्या. या निवडणुकीत चारोस्कर यांनी पक्षप्रवेश न करता भाजपला साथ देण्याची भूमिका घेतल्यानंतर सद्या युतीच्या जागावाटपात दिंडोरी शिवसेनेकडे असून, ते आता काय भूमिका घेतात यावर राजकीय समीकरण तयार होणार आहे.  तर माकप ने दिंडोरी मतदारसंघात यावेळी जास्तीचे मते घेतल्याने माकप ची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. युती आघाडी कायम राहिल्यास विद्यमान आमदार नरहरी झरिवाळ व माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्यात लढत होणार हे जवळपास निश्चित असणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालdindori-pcदिंडोरी