शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
3
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
4
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
5
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
6
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
7
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
8
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
9
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
10
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
11
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
12
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
13
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
14
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
15
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
16
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
17
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
18
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
19
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
20
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर तालुक्यात राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 17:27 IST

सिन्नर तालुक्यातील विविध महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त प्रभातफेरी, पाथनाट्य सादर करण्यात आले. मतदारांचे प्रबोधन करणाऱ्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

येथील तहसील कार्यालयात राष्ट्रीय मतदारदिन साजरा करण्यात आला. यावेळी तहसीलदार नितीन गवळी, पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील सिन्नर महाविद्यालय, शेठ ब. ना. सारडा, आरंभ विद्यालय व महात्मा फुले विद्यालय, जनता विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी महात्मा फुले पुतळ्यापासून तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढली. मतदान व मतदाराचे महत्व पटवून देण्यात आले. मतदार दिनानिमित्त झालेल्या स्पर्धेमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते निवडणूक आयोग व महाराष्ट्र शासनाचे प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. पाथरे हायस्कूल व एस. जी. ज्युनिअर कॉलेज येथे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त प्रभात फेरी काढून प्रबोधन करण्यात आले. प्राचार्य पी. एन. रानडे, पर्यवेक्षक एन. एस. कानस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रभात फेरी दरम्यान विद्यार्थ्यांनी साक्षर जनता-भूषण भारता, मतदार राजा जागा हो- लोकशाहीचा धागा हो, छोडकर सारे काम- चलो करे मतदान आदी प्रकारच्या घोषना देण्यात आल्या. गावातून प्रबोधन प्रभात फेरी काढली. यात पाथरे बुद्रुकचे सरपंच मधुकर नरोडे, माजी सरपंच भाऊसाहेब नरोडे, माजी सरपंच मच्छीन्द्र चिने, संपत चिने आदी मान्यवर सामील झाले होते. प्रभात फेरीचे नेतृत्व युवराज सोनवणे, प्रसन्न काळे, अजिंक्य नरोडे, मयूर चिने, सीमा बर्डे, शालिनी नरोडे, पूजा वाघ, साक्षी भवर, तेजिस्वनी चीने आदींनी केले. सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या पुंजाजी रामजी भोर विद्यालय व डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस मतदार जनजागृती फेरी काढून व ठिक ठिकाणी मतदार जनजागृती नाटिका सादर करत साजरा करण्यात आला. भोर विद्यालयाचे प्राचार्य व्ही.एस. कवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्र मास जिल्हा परिषद सदस्य वनिता शिंदे, सरपंच सीमा शिंदे, शेखर कर्डिले, बी. बी. पगार, एस. एस. शेणकर, एस. ओ. सोनवणे, डि.बी. दरेकर, आर. सी. काकड, एल. बी. वायाळ आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

टॅग्स :tahasil chowkतहसील चौकSchoolशाळा