चांदवड : चांदवड येथे नाशिक जिल्हा विधी सेवा समिती यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका विधी सेवा समिती चांदवड व चांदवड तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी राष्टÑीय लोकन्यायालय संपन्न झाले.या लोकन्यायालयात तीन पॅनल ठेवण्यात आले होते.पॅनल नंबर एक मध्ये न्यायमुर्ती के.जी.चौधरी,पॅनल नंबर दोन मध्ये न्यायमुर्ती एस.एस. धपाटे , पॅनल नंबर तीन मध्ये न्यायमुर्ती एस.पी. कुलकर्णी यांनी काम बघीतले. पॅनल सदस्य म्हणून अॅड. डी.आर.गांगुर्डे, अॅड. पी.पी. पवार, अॅड. पी.एस. कोतवाल, अॅड. एस. एन.पानसरे, अॅड. ए. एस. थोरमिसे, अॅड. कल्पना निबांळकर या विधीतज्ञांनी काम पहिले. या राष्टÑीय लोक न्यायालयामध्ये एकूण २४७ दिवाणी व फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ७४ प्रकरणामध्ये तडजोड झाल्याने निकाली काढण्यात आली. या लोकन्यायालयात तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड . दिनकर ठाकरे, अॅड. बी.जी.पटेल, अॅड. केशरचंद पाटणी, अॅड. शिवाजी सोनवणे, अॅड.पंडीतराव चव्हाण, अॅड. विनायक घुले, वकील संघाचे सर्व सदस्य, चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहीते, वडनेरभैरवचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, गटविकास अधिकारी हिरामण मानकर, विस्तार अधिकारी, सर्व ग्रामपंचायत, नगरपरिषदेचे कर्मचारी , पोलीस कर्मचारी न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्टÑीय लोकन्यायालय : ४०१५ प्रकरणे निकाली एक कोटी १५ लाखांची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:42 IST
चांदवड : तालुका विधी सेवा समिती व चांदवड तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी राष्टÑीय लोकन्यायालय संपन्न झाले.
राष्टÑीय लोकन्यायालय : ४०१५ प्रकरणे निकाली एक कोटी १५ लाखांची वसुली
ठळक मुद्दे ७४ प्रकरणामध्ये तडजोडकर्मचारी, पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित