शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

नॅशनल मोटोक्रॉस सुपरक्रॉस चॅम्पियनशिप : पुण्याचा ऋग्वेद ‘बेस्ट रायडर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:31 IST

नॅशनल मोटोक्रॉस सुपरक्रॉस चॅम्पियनशिप स्पर्धेत नाशिकमधील पाचव्या फेरीनंतर स्पर्धेची चुरस वाढली असून, मागील चारफेऱ्यांमध्ये आघाडीवर असलेला केरळच्या हरिथ नोव्हाला केरळच्याच सी. डी. जीनन यांच्याकडून कडवे आव्हान उभे रहिले आहे.

नाशिक : नॅशनल मोटोक्रॉस सुपरक्रॉस चॅम्पियनशिप स्पर्धेत नाशिकमधील पाचव्या फेरीनंतर स्पर्धेची चुरस वाढली असून, मागील चारफेऱ्यांमध्ये आघाडीवर असलेला केरळच्या हरिथ नोव्हाला केरळच्याच सी. डी. जीनन यांच्याकडून कडवे आव्हान उभे रहिले आहे. नाशिकमध्ये ऋग्वेद बारगुजे यांने प्रथम क्रमांक मिळविला, तर नोव्हा दुसºया क्रमांकावर राहिला. पेठेनगर येथील मैदानावर झालेल्या राष्टÑीय स्पर्धेत १२० बाइकर्सने आपले कौशल्यपणाला लावून स्पर्धेची चुरस वाढविली. फॉरेन ओपन क्लास ग्रुपमध्ये कोचीन, गोवा, कोईम्बतूर, जयपूर या ठिकाणी झालेल्या फेºयांमध्ये नोव्हा आघाडीवर असून, पाचव्या फेरीअंतिही तो दीडशेपेक्षा अधिक गुण घेऊन आघाडीवर आहे. त्याला या स्पर्धेत तिसºया क्रमांकावर आलेला सी. डी. जीननकडून कडवी झुंज मिळत आहे. नोव्हा आणि जिननमध्येच बडोदा येथे अंतिम लढत रंगणार आहे.नाशिकमध्ये झालेल्या या थरारक मोटारबाइकमध्ये ऋग्वेद बारगुजे याने प्रथम, हरिथ नोव्हा द्वितीय, तर सी. डी. जीनन तृतीय क्रमांकावर राहिले. बारगुजे आणि नोहा यांनी ३५ गुणांची कमाई केली, तर जीनन याने ४ गुण मिळविले. नॉइस ग्रुप सीमध्ये कालिमोहन, राजेंद्र आर. ई., सॅम्युअल जेकब यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला. इंडियन गटात जगदीश कुमारने २० गुणांची आघाडी घेतली आहे, तर इम्रान पाशा आणि कार्तिकेयन यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला.आॅस्ट्रेलियन बाइकर्सची प्रात्यक्षिकेहवेत उंच उडालेल्या बाइकवरील कसरती आणि त्यावर नियंत्रण मिळविण्याचा अफलातून साहसी खेळ यावेळी झाला. आॅस्ट्रेलियाचे फ्रीस्टाइल बाइक स्टंटबाज जॉर्डन स्पेरग व शॉन वेब यांनी हवेत बाइक उडवून त्यावर आपले कौशल्य दाखविले. उंच उडालेली बाइक, हवेतच बाइकवर मिळविलेले नियंत्रण आणि कलाबाजी नाशिकरांचा साहसी खेळाचा अनुभव घेता आला. अत्यंत धाडसी अशा स्टंटबाजीने स्पर्धेची रंगत अधिक वाढविली.यश पवार आपल्या गटात तिसराआजारपणामुळे अपेक्षित परफॉर्मन्स देऊ न शकलेला नाशिकचा रायडर यश पवार याने आपल्या गटात तिसरे स्थान मिळविले. आउट आॅफ फॉर्म असलेल्या पवारने पहिले तीन राउंड न खेळताही चांगली कामगिरी केली. नाशिकचा हर्षल कडभाने याला मात्र अपेक्षित कामगिरी करता आली नाही. परंतु या दोन्ही नाशिककरांच्या खेळाला नाशिकच्या प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत यांचे मनोधैर्य वाढविले.

टॅग्स :motercycleमोटारसायकलNashikनाशिक