शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या दोन ग्रामपंचायतींना राष्टÑीय पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 20:10 IST

केंद्र शासनामार्फत पंचायत राज संस्थेच्या उल्लेखनीय कामकाजाबाबत प्रोत्साहन मिळावे व क्षेत्रीय स्तरावर विकासात्मककामे होऊन पंचायत राज संस्थेमार्फत मिळणाºया सुविधांसाठी दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार योजना सुरू करण्यात आली

ठळक मुद्देओढा, कोटमगावचा समावेश : दिल्लीत होणार वितरण जिल्ह्यातील एकूण १३८५ ग्रामपंचायतींना प्रत्येकी १०० गुणांसाठी ३९ प्रश्नावलीसह प्रस्ताव सादर

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : केंद्र शासनाचा दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार जाहीर झाला असून, त्यात नाशिक तालुक्यातील ओढा व कोटमगाव या दोन ग्रामपंचायतींचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्याला राष्ट्रीय स्वरूपाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल गुरुवारी जिल्हा परिषदेच्या वतीने दोन्ही ग्रामपंचायतीचे सरपंच, पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण पंतप्रधानाच्या हस्ते दिल्ली येथे करण्यात येणार असून, दोन्ही ग्रामपंचायतींना प्रत्येकी दहा लाख रुपये व सन्मान चिन्हासह गौरविण्यात येणार आहे.

केंद्र शासनामार्फत पंचायत राज संस्थेच्या उल्लेखनीय कामकाजाबाबत प्रोत्साहन मिळावे व क्षेत्रीय स्तरावर विकासात्मककामे होऊन पंचायत राज संस्थेमार्फत मिळणाºया सुविधांसाठी दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार योजना सुरू करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील एकूण १३८५ ग्रामपंचायतींना प्रत्येकी १०० गुणांसाठी ३९ प्रश्नावलीसह प्रस्ताव सादर केले होते. सदर प्रस्तावांची केंद्र शासनामार्फत तपासणी करण्यात आली असून, त्यात नाशिकसह महाराष्टÑातील चौदा ग्रामपंचायती पात्र ठरल्या आहेत.सदर पुरस्कार प्राप्त झाल्याबाबत गुरुवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, ग्रामपंचायतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, आनंद पिंगळे यांच्या हस्ते ओढा ग्रामपंचायतीचे सरपंच विष्णू पेखळे, उपसरपंच शशिकांत सहाणे, ग्रामसेवक दौलत गांगुर्डे, तसेच कोटमगाव ग्रामपंचायतीचे सरपंच बाळकृष्ण म्हस्के, उपसरपंच समाधान जाधव व ग्रामसेवक बाळासाहेब कदम, जिल्हा परिषद सदस्य यशंवत ढिकले, पंचायत समितीच्या सभापती विजया कांडेकर, गट विकास अधिकारी डॉ. सारिका बारी, विनोद मेढे, श्रीधर सानप, जगन्नाथ सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला, तर अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दोन्ही ग्रामपंचायतींच्या पदाधिकारी, अधिकाºयांचे कौतुक केले आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद