शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
2
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
3
तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
4
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
5
नोकरीत मन रमेना, म्हणून सुरु केली नायका; फाल्गुनी नायर कशा बनल्या सर्वात श्रीमंत 'सेल्फ-मेड' महिला?
6
शिंदेसेना-राष्ट्रवादीचा ५९:४१ टक्के जागांचा फॉर्म्युला; मध्यरात्रीपर्यंत चर्चांचा घोळ, भाजप युतीसाठी अनुत्सुक
7
BMC ELection BJP List: भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? 
8
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
9
या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले...
10
"एक सूप मी ८ दिवस पाणी घालून प्यायचे...", 'तुझ्यात जीव रंगला'मधल्या वहिनीसाहेबांनी सांगितला कठीण काळ
11
वंदे भारत, राजधानी विसरा; हायड्रोजन ट्रेन लोको पायलटला किती पगार मिळणार? लवकरच सेवेत येणार
12
धनु राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रगती आणि भाग्योदयाचे वर्ष; जोखीम घेण्याची वृत्ती देईल मोठे यश! 
13
Gold Silver Price Today: चांदी एका झटक्यात ₹१५,३७९ नं महागली, सोनंही नव्या उच्चांकी स्तरावर; पटापट चेक करा १८, २२ आणि २४ कॅरेटचा भाव
14
कुलदीप सेंगरचा जामीन स्थगित; उन्नाव बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
15
अहिल्यानगरमध्ये उद्धवसेनेला हादरा, पक्षात अंतर्गत मतभेद; तेजस्विनी राठोडांनी भरला अपक्ष अर्ज
16
Health Tips: महिलांनो, स्वच्छतेच्या नादात आरोग्याशी खेळू नका; जेट स्प्रेचा चुकीचा वापर ठरू शकतो धोकादायक!
17
स्मार्टफोन बाजारात मोठा उलटफेर.! भारतीयांनी २०२५ मध्ये या मॉडेलचे ५६ लाख स्मार्टफोन खरेदी केले; ठरला भारताचा नंबर १ 
18
Travel : स्वप्नातलं शहर की वास्तवातली जादू? पाण्यावर तरंगणाऱ्या वेनिस शहरात 'असा' करा स्वस्तात प्रवास!
19
Thane Politics: शिंदे-चव्हाण स्वतःचे बालेकिल्ले राखण्यासाठी 'ठाणे, कडोंम'मध्ये एकत्र; मीरा-भाईंदर, नवी मुंबईचं काय?
20
जागावाटपाचे घोडे अडलेलेच! काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडीचा दावा, जागा गुलदस्त्यात
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेतून ३०, ५० मीटर होणार बंद

By admin | Updated: May 23, 2014 01:06 IST

अखेरची स्पर्धा : ऑलिम्पिकच्या नियमानुसार होणार स्पर्धा

अखेरची स्पर्धा : ऑलिम्पिकच्या नियमानुसार होणार स्पर्धानरेश हाळणोर / नाशिक : आंतरराष्ट्रीय पातळीवर होणार्‍या धनुर्विद्या स्पर्धेमध्ये रिकर्व्ह (फिटा) या प्रकारालाच जशी मान्यता आहे त्याचप्रमाणे केवळ ७० मीटर अंतराच्याच दोन फेर्‍या होतात. आता याच धर्तीवर भारतातीलही स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे राष्ट्रीय स्पर्धांमध्ये होणार्‍या ३०, ५० आणि ६० मीटर अंतराच्या स्पर्धा बंद होणार आहेत तर खेळाडूंना प्रोत्साहन आणि सराव व्हावा यासाठी इंडियन राऊंडमधून ५० मीटर अंतराची स्पर्धा मात्र सुरूच राहणार आहे. जुन्या नियमांनुसारची नाशकात होणारी शालेय राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धा अखेरची असणार असून, यापुढील स्पर्धा या ऑलिम्पिकच्या नियमांनुसारच होणार आहे. भारतामध्ये अजूनही अनेक स्पर्धा या आंतरराष्ट्रीय नियमानुसार होत नाहीत. याबाबत अनेकदा वादही झाले आहेत. काही वर्षांपूर्वी कुस्तीच्या बाबतीतही असे झाले होते. मातीच्या कुस्तीमध्ये खेळण्याचा पहिलवानांना सराव असल्याने त्यांना मॅटवर खेळणे कठीण जात होते. मात्र आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स फेडरेशन व ऑलिम्पिक संघाने मॅटचे बंधन घातल्यानंतर अनेक वर्षे भारताने त्यास विरोध दर्शविण्याचा प्रयत्न केला. अखेर तेच नियम मान्य केल्यानंतर गेल्या काही स्पर्धांमधून भारताला कुस्तीमध्ये पदकेही मिळत आहेत. नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेपासून क्रिकेटव्यतिरिक्त इतर खेळांचीही प्रसिद्धी झाली. त्यात धनुर्विद्या स्पर्धेचाही समावेश होता. मात्र भारतामध्ये आजतागायत ऑलिम्पिक वा आंतरराष्ट्रीय नियमांनुसार ही स्पर्धा होत नव्हती. आंतरराष्ट्रीय पातळीवर रिकर्व्ह (फिटा) हा प्रकार वापर करणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे फक्त ७० मीटर अंतराच्याच दोन फेर्‍यातून २४ राऊंड होतात. भारतामध्ये राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमधून फिटा प्रकारात ३० मीटर, ५० मीटर आणि ७० मीटर अंतराच्या फेर्‍या होतात. मात्र या वर्षापासून ऑलिम्पिकच्या नियमानुसारच राष्ट्रीय स्पर्धांमधूनदेखील केवळ ७० मीटर अंतराच्या १२ राऊंडच्या दोन फेर्‍या घेतल्या जाणार आहेत. २४ राऊंडमधून मिळालेल्या गुणांतून खेळाडूंची पदके ठरतील. त्यामुळे नाशिकमध्ये सुरू असलेली शालेय राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धा ही जुन्या नियमांनुसार होणारी अखेरची स्पर्धा ठरणार आहे. इंडियन राऊंडमधून ३० मीटर बंददरम्यान, रिकर्व्ह (फिटा) या प्रकारामधून जशा फक्त ७० मीटरच्याच स्पर्धा होतील त्याचप्रमाणे इंडियन राऊंडमधूनही केवळ ५० मीटरच्याच स्पर्धा होतील. या गटातील ३० मीटरची स्पर्धा यानंतरच्या स्पर्धांमधून होणार नाहीत. त्यामुळे भारतीय खेळाडूंना ५० मीटरमध्ये २४ राऊंड खेळावे लागतील.