शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

लॉकडाउन काळात नटली बोरगडची जैवविविधता...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 23:21 IST

नाशिक : पक्ष्यांच्या १०५ पेक्षा अधिक प्रजाती, ‘अ‍ॅनामल्स नवाब’सारखी अनेक दुर्मीळ फुलपाखरे अन् पिंक स्ट्रीप लीलीसारख्या (गडांबी कांदा) शेकडो दुर्मीळ वनस्पती तसेच साळींदरपासून विविध वन्यप्राणी, सरपटणाऱ्या प्राण्यांचे माहेरघर असलेले, जैवविविधतेने नटलेले बोरगड संवर्धन राखीव वन हे नाशिक शहराच्या वेशीजवळील नंदनवनच आहे. नाशिक जिल्ह्याच्या पर्यावरणात अन् नैसर्गिक जैवविविधता टिकवून ठेवण्यात या वनाचा सिंहाचा वाटा आहे.

नाशिक : (अझहर शेख) पक्ष्यांच्या १०५ पेक्षा अधिक प्रजाती, ‘अ‍ॅनामल्स नवाब’सारखी अनेक दुर्मीळ फुलपाखरे अन् पिंक स्ट्रीप लीलीसारख्या (गडांबी कांदा) शेकडो दुर्मीळ वनस्पती तसेच साळींदरपासून विविध वन्यप्राणी, सरपटणाऱ्या प्राण्यांचे माहेरघर असलेले, जैवविविधतेने नटलेले बोरगड संवर्धन राखीव वन हे नाशिक शहराच्या वेशीजवळील नंदनवनच आहे. नाशिक जिल्ह्याच्या पर्यावरणात अन् नैसर्गिक जैवविविधता टिकवून ठेवण्यात या वनाचा सिंहाचा वाटा आहे.राज्यातील पहिले संवर्धन राखीव वनक्षेत्र म्हणून नावलौकिक मिळविणाºया बोरगड वनात लॉकडाउनच्या काळात निसर्गाच्या कुशीत अनेक प्राणी, पक्षी निर्धास्तपणे वास्तव्य करत आहेत. मानवी हस्तक्षेपापासून दूर राहिलेल्या या वनात सर्वच प्रकारच्या माणसांची वर्दळ आता दीड ते दोन महिन्यांपासून थांबलेली दिसते.यामुळे येथील जैवविविधता अधिकच समृद्ध झालेली पहावयास मिळते. ५ मार्च २००८ साली जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील बोरगड येथील वनाला राज्यातील पहिले संवर्धन राखीव वनक्षेत्राचा दर्जा राज्य शासनाच्या वनमंत्रालयाने दिला.यानंतर वनविभागाने गांभीर्याने याकडे लक्ष पुरविण्यास सुरुवात केली. यासाठी ‘एनसीएसएन’चे संस्थापक अध्यक्ष निसर्गप्रेमी दिवंगत बिश्वरूप राहा यांनी मोठा लढा दिला होता. वनाला लागून असलेल्या तुंगलदरा, आशेवाडी, देहेरवाडी या गावांनाही आता या राखीव वनाचे महत्त्व पटले आहे. नाशिकपूर्व वनविभागाच्या अखत्यारित येणाºया या संवर्धन राखीव वनासाठी ८५ टक्के निधी खर्च करण्याची तयारी उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी दर्शविली आहे.----------------------------------पक्ष्यांच्या एकूण १०५ प्रजातीपावसाळ्यात बोरगडचे सौंदर्य डोळ्यांची पारणे फेडणारे असते. गेल्यावर्षी फुलांमध्ये पिंक स्ट्रीप लीलीदेखील (गडांबी कांदा) या वनात फुलली होती. कंदीलपुष्पकच्या तीन प्रजाती या वनात पहावयास मिळतात.घुबड, घार, मोर, लालबुड्या, बुलबुल, बाबलर, जांभळा सूर्यपक्षी, गिधाड, शिक्र ा, ससाणा, गरूड यांसारख्या स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांच्या एकूण १०५ प्रजातींची नोंद येथे झाली आहे.बिबट्या, तरस, कोल्हा, रानससे, साळींदर, उदमांजर, रानमांजर, रानडुकरे यांसारखे वन्यजीव बोरगडच्या राखीव वनात आढळतात. सरपटणाºया प्राण्यांमध्ये घोरपडसह नाग, घोणस, मण्यार, हरणटोळ, धामण यांसारख्या सर्पांचाही येथे वावर आहे.-----------------------------आजूबाजूच्या गावांमधील लोक आता उन्हाळ्यातही शेती करू लागले. कारण भूजलपातळी वाढण्यास या राखीव वनामुळे मदत झाली. पश्चिम घाटातील प्राणी, पक्षी, वनस्पती या ठिकाणी आढळतात. पश्चिम घाटातील जैवविविधतेचे हे एक परिचयकेंद्रच आहे. नाशिक जिल्ह्याच्या पर्यावरणात आणि नैसर्गिकजैवविविधतेत बोरगड संवर्धन वनाचा सिंहाचा वाटा आहे.- प्रतीक्षा कोठुळे,पर्यावरण अभ्यासक--------------------------------बोरगड वनात आढळून येणारी वन्यप्राणी, पक्षी, सर्प, वनस्पती यांची जैवविविधता ही पश्चिम घाटातील दुर्मीळ आहे. त्यामुळे या राखीव वनाला पर्यावरणाच्या दृष्टीने अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त आहे. समृद्ध जैवविविधतेने नटलेले हे राखीव वन नाशिककरांनी अधिकाधिक सुरक्षित ठेवायला हवे.- अभिजित महाले, वन्यजीव प्रेमी

टॅग्स :Nashikनाशिक