शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

रंगीबेरंगी रानफुलांच्या पीतांबरीने नटली सृष्टी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 00:21 IST

पेठ : बालकवींच्या फुलराणी कवितेतील या ओळी ऐकल्या की, मानवी मन थेट धाव घेते ते फुलाफुलांत. ग्रामीण निसर्गात वर्षभर असंख्य फुले फुलतात. त्यात सर्वच ऋतूंमध्ये वेगवेगळी फुले आपला रंग दाखवत असतात; पण पावसाळ्यातील रंगोत्सव काही वेगळाच आनंद देणारा असतो. पावसाची चाहूल लागली की, वसुंधरा जणू सज्ज होते निसर्गाकडून आपला शृंगार करून घेण्यासाठी. आणि निसर्गदेखील मुक्त हस्ताने आपल्या जादूच्या पोतडीतून वेगवेगळी फुले, पाने, फुलपाखरे, कीटक एक ना दोन सगळ्याच गोष्टींची उधळण करून वसुंधरेचा शृंगार करतो.

पेठ : हिरवे हिरवे गार गालिचेहरित तृणांच्या मखमालीचेत्या सुंदर मखमालीवरतीफुलराणी ही खेळत होती...बालकवींच्या फुलराणी कवितेतील या ओळी ऐकल्या की, मानवी मन थेट धाव घेते ते फुलाफुलांत. ग्रामीण निसर्गात वर्षभर असंख्य फुले फुलतात. त्यात सर्वच ऋतूंमध्ये वेगवेगळी फुले आपला रंग दाखवत असतात; पण पावसाळ्यातील रंगोत्सव काही वेगळाच आनंद देणारा असतो.पावसाची चाहूल लागली की, वसुंधरा जणू सज्ज होते निसर्गाकडून आपला शृंगार करून घेण्यासाठी. आणि निसर्गदेखील मुक्त हस्ताने आपल्या जादूच्या पोतडीतून वेगवेगळी फुले, पाने, फुलपाखरे, कीटक एक ना दोन सगळ्याच गोष्टींची उधळण करून वसुंधरेचा शृंगार करतो.आधुनिकीकरणाच्या नावाखाली उभ्या झालेल्या सिमेंटच्या जंगलात हे सहज जाणवत नसलं तरी प्रत्यक्ष खऱ्याखुºया डोंगरदºयात विसावलेल्या निसर्गात गेलात तर या चमत्कारिक दुनियेचा नक्की आनंद घेता येईल. एरव्ही आपल्याशी हितगूज करणारे जंगल आता हसत असतं, नाचत असतं आणि गातदेखील असतं तेही वेगवेगळ्या फुलांच्या माध्यमातून. मानवी मनाला मोहून टाकणाºया सप्तरंगांची उधळण करीत ग्रामीण भागातील डोंगरदºयात नानाविध रानफुलांनी निसर्गसृष्टीला जणूकाही पिंताबर परिधान केल्याचे चित्र श्रावणमासात दिसून येते. या निसर्गरम्य सप्तरंगी वातावरणात हिरव्यागार माळरानावर साज चढवतात ती विविधरंगी रानफुले. पावसाळ्यात ग्रामीण भागात डोंगर उतारावर दुर्मीळ अशी रानफुलं उमलत असतात.-------------सप्तरंगांची उधळणखडकावर, डोंगरकपारीत, माळरानात, झाडांवर मोठ्या प्रमाणावर सप्तरंगांची उधळण करणारे फुले दृष्टीस पडतात. याच फुलांकडे आकर्षित होत असंख्य फुलपाखरे, मधमाशा या निसर्गरम्य पर्वणीचा आस्वाद घेत असतात.-------------..अशी आहेत रानफुलेकवळीची फुले, शेवळाची फुले, कळलावी, रानभेंडी, कुरडू, अंबाडी, गंतुरी, चाफा, हरणडोडी, टंटणी, दिंडा, कवदर, शोनक, निरगुडी, साग, खुरासणी, घाणेरी, तोंडली, कारवी, करदळी, सीतेची वेणी, रुई, धोतरा, टेहरा, भोंडरा, ताह्मण, रानझेंडू, नेवाळा, कचोरा, तरोटा, हादगा.

टॅग्स :Nashikनाशिक