शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

 रस्ते बुडल्याने जिल्हातील बसवाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 16:46 IST

नाशिक : गेल्या चोवीस तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे जिल्ह्यातील संपुर्ण प्रवासी वाहतूक सेवा ...

ठळक मुद्देपरिवहन सेवा विस्कळीत : धोकादायक पुलांमुळे मार्ग बंद

नाशिक: गेल्या चोवीस तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे जिल्ह्यातील संपुर्ण प्रवासी वाहतूक सेवा विस्कळीत झाली असून अनेक ठिकाणी बसेस रस्त्यातच थांबवून ठेवण्यात आलेल्या आहेत. नाशिक-पुणे आणि नाशिक-धुळे वगळता इतर मार्गावरील सर्व वाहतूक पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आलेली आहे.जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नदीला आलेला पूर आणि रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे प्रवासी वाहतूक सेवा करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा दुपारी बारा वाजेनंतर पुर्णविस्कळीत झाली. पेठ आणि सुरगाणा तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने या मार्गावरील सर्व बसेस बंद करण्यात आलेल्या आहेत. या मार्गावरील अनेक लहान पूूल आणि फरशीपूल पाण्याखाली गेले आहेत संभाव्य धोका लक्षात घेऊन या मार्गावरील वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आली आहे. पेठ येथील रस्त्यांवर दोन ते तीन किलोमीटर पर्यंत रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहत आहे तर काही ठिकाणी रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या मार्गावर कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीला प्रशासनाने मनाई केलेली आहे.याबरोबरच इगतपुरी, त्र्यंबकेश्वर येथे अडीचशे ते तीनशे मि.मी. पाऊस होत असल्यामुळे या मार्गावरील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात साचलेले पाणी आणि ठिकठिकाणी खड्डे पडल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव या मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आल्याने बसेस थांबविण्यात आल्या तर काही बसेसला माघारी पाठविण्यात आले. चांदवड, मनमाड, येवला आणि सटाणा येथील बससेवा वगळता अन्य मार्गांवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. नाशिक पेठ मार्गावरील चापडगाव येथे पूल पाण्याखाली गेल्यामुळे या गावाचा संपर्क तुटला असल्याने वाहतूकही विस्कळीत झालेली आहे. तसेच कसारा घाटात दरड कोसळल्यामुळे घोटी-इगतपुरी मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस