शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

 नाशिकचे वकील उतरले रस्त्यावर : ‘कोर्ट फी वाढ रद्द झालीच पाहिजे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 19:00 IST

मुदतीच्या अर्जासाठी रुपये १० ऐवजी ५० रुपये करण्यात आले असून मृत्युपत्र, वारसा दाखला याबाबतही शुल्क वाढविण्यात आले आहे.

ठळक मुद्देदिवसभर धरणे आंदोलनआदेशाच्या प्रतींची होळी

 नाशिक : राज्य शासनाने काढलेल्या न्यायालयीन शुल्कवाढीच्या आदेशाच्या निषेधार्थ शहरातील वकिलांनी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करत आदेशाच्या प्रतींची होळी केली. त्याचप्रमाणे न्यायालयीन कामकाजापासून स्वत:ला अलिप्त ठेवले.राज्य शासनाने १६ तारखेला कोर्ट फी अ‍ॅक्टमध्ये दुरुस्ती करून कोर्ट फीमध्ये भरमसाठ वाढ केल्यामुळे संतप्त वकिलांनी न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर गुरुवारी (दि.२५) तीव्र आंदोलन केले. नाशिक बार असोसिएशनच्या वतीने आंदोलन करण्यात आले. दिवाणी दाव्याची जास्तीत जास्त शुल्क रुपये तीन लाख होती; मात्र ती दहा लाख करण्यात आली आहे. मुदतीच्या अर्जासाठी रुपये १० ऐवजी ५० रुपये करण्यात आले असून मृत्युपत्र, वारसा दाखला याबाबतही शुल्क वाढविण्यात आले आहे. त्यामुळे वादात अडकलेल्या नागरिकांना न्याय मिळविण्यासाठी न्यायालयाची पायरी चढणे जिकिरीचे होणार असल्याचे असोसिएशनने प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. त्याच्या निषेध म्हणून गुरुवारी शहरातील सर्व वकिलांनी एकत्र येत अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आहुजा, सचिव अ‍ॅड. जालिंदर ताडगे आदींच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत राज्य शासनाने दुरुस्ती केलेल्या आदेशाच्या प्रती जाळून संताप व्यक्त केला. ‘कोर्ट फी वाढ रद्द झालीच पाहिजे’ अशा घोेषणा देत शासनाचा निषेध व्यक्त केला. नाशिक जिल्हा वकील संघाने सदर भरमसाठ कोर्ट फी वाढीच्या निषेधाचा ठराव मंजूर केला आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा वकील संघ तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका वकील संघ न्यायालयीन कामकाजापासून स्वत:ला अलिप्त ठेवले. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन सुरू होते.

टॅग्स :advocateवकिलCourtन्यायालयNashikनाशिक