शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकला वाळू तस्करांचा पाठलाग करून गाड्या पकडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 14:29 IST

नाशिक जिल्ह्यातील २४ वाळूच्या ठिय्यांच्या लिलावाची प्रक्रीया गौणखनिज विभागाने सुरू केली असताना, दोन वेळा जाहीर लिलावासाठी जाहीरात देवूनही वाळू ठेकेदारांनी लिलावाकडे पाठ फिरवि

ठळक मुद्देवसुली जोरात : तापी, सारंगखेड्याची वाळू नाशकातवाळूला नाशिक व मुंबईत चांगली मागणी

नाशिक : उच्च न्यायालयाने राज्यातील वाळू लिलावाला स्थगिती दिलेली असतानाही सारंगखेडा, तापी नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करून तस्करांकडून त्याची बेकायदेशीर वाहतूक केली जात असून, नाशिक शहरात चोरी, छुप्या पद्धतीने आणल्या जात असलेल्या वाळूच्या गाड्या महसूल विभागाच्या भरारी पथकाने पाठलाग करून पकडल्या आहेत.नाशिक जिल्ह्यातील २४ वाळूच्या ठिय्यांच्या लिलावाची प्रक्रीया गौणखनिज विभागाने सुरू केली असताना, दोन वेळा जाहीर लिलावासाठी जाहीरात देवूनही वाळू ठेकेदारांनी लिलावाकडे पाठ फिरविली. प्रशासनाने तिसºयांदा फेरलिलावाची तयारी करतांना वाळू लिलावासाठी अपसेट रक्कम कमी करण्याची तयारी चालविली असतानाच गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने वाळू लिलावांना स्थगिती दिली आहे. असे असतानाही शहरात मोठ्या प्रमाणावर चोरी, छुप्या पद्धतीने वाळूची वाहतूक केली जात आहे. यंदा वाळू लिलावाला स्थगिती मिळाल्यामुळे प्रशासनाला वाळू लिलावातून मिळणाºया रक्कमेला मुकावे लागणार असल्याने त्यावर तोडगा म्हणून महसूल विभागाने गौण खनिजाच्या चोरी विरूद्ध मोहिम उघडून त्यासाठी भरारी पथके तैनात केली आहेत. साधारणत: रात्री व पहाटेच्या वेळी नाशिक शहरात वाळू तस्कारांकडून वाळूची वाहतूक केली जात असल्याने याच काळात महत्वाच्या ठिकाणांवर भरारी पथके तैनात करण्यात आले आहेत. रविवारी शासकीय सुटीच्या दिवशी महसूलची पथके सुटीवर असल्याचे समजून मोठ्या प्रमाणावर वाळू वाहतूक सुरू असल्याने अशा जवळपास चार मोठे ट्रक मुंबई-आग्रा महामार्गावर ठिकठिकाणी अडविण्यात आले. चालकांकडे वाळू वाहतुकीचा परवाना तसेच रॉयल्टी भरल्याची पावती मागितली असता ती नसल्याने सदर वाळू चोरीची असल्याच्या संशयावरून ट्रक ताब्यात घेण्यात आले आहेत. ताब्यात घेतलेल्या ट्रकमध्ये सारंगखेडा, तापी नदीतील वाळू असून, या वाळूला नाशिक व मुंबईत चांगली मागणी असल्यामुळे साधारणत: पाच हजार रूपये ब्रास या दराने वाळूची विक्री केली जात आहे. नाशिक तहसिल कार्यालयाने वाळू तस्करांविरूद्ध मोहिम उघडली असून, वाळूच्या दराच्या पाचपट दंड आकारणीच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यातून लाखो रूपये महसूल गोळा झाला आहे.

 

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक