शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांची माहिती गोळा  करण्यात राज्यात नाशिक दुस-या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 15:29 IST

१ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत भारत निवडणूक आयोगाने मतदार पुर्नरिक्षण मोहिम राबविली. प्रत्येक विधानसभा मतदार संघ निहाय मतदार याद्यांचे अद्यावतीकरण करण्याबरोबरच घरोघरी जावून मतदारांची माहिती संकलित करणे,

ठळक मुद्देबीड प्रथम : मतदारांची माहिती गोळाजवळपास ४,९०,५७५ घरांना भेटी

नाशिक : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदार पुर्नरिक्षण मोहिमेंतर्गंत मतदारांची घरोघरी जाऊन माहिती गोळा करण्याच्या विशेष मोहिमेत नाशिकने थेट राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला असून, सुमारे ४,९० हजार घरांना भेटी देवून मतदारांची अद्यावत माहिती संकलित करण्यात आली आहे. या मोहिमेत बीड जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. अन्य मोठ्या शहरांमध्ये नाशिकच अग्रेसर राहिला आहे.१ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत भारत निवडणूक आयोगाने मतदार पुर्नरिक्षण मोहिम राबविली. प्रत्येक विधानसभा मतदार संघ निहाय मतदार याद्यांचे अद्यावतीकरण करण्याबरोबरच घरोघरी जावून मतदारांची माहिती संकलित करणे, नवीन मतदार नोंदणी करणे, दुबार नाव वगळणे, मतदार केंद्रांचे स्थलांतर करणे, मतदाराच्या घरी गेल्यावर त्याचे अक्षांश, रेखांश जोडणे अशा प्रकारचे कामे केंद्रस्तरीय अधिकाºयांच्या (बीएलओ) मदतीने पार पाडण्याच्या आयोगाच्या सुचना होत्या, परंतु यंदा शिक्षकांनी हे काम करण्यास नकार दिल्याने मोठा अडथळा निर्माण झाला होता. शिक्षकांनी या कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. अशाही परिस्थितीत निवडणूक शाखेने शिक्षकांना कधी गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देवून तर कधी अंजारून गोंजारून काम करण्यावर भर दिला होता. नाशिक जिल्ह्यातील एकूण साडेसात लाख घरभेटी देवून माहिती गोळा करण्याच्या या मोहिमेत शेवटच्या टप्प्यात केंद्र स्तरीय अधिकारी सहभागी झाल्याने ३० डिसेंबर अखेर जवळपास ४,९०,५७५ घरांना भेटी देवून माहिती गोळा केली आहे. राज्यात नाशिकने दुसरा क्रमांक पटकाविला आहे.निवडणूक आयोगाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्याने या संदर्भात केलेल्या माहितीचा गोषवारा प्रसिद्ध केला असून, त्यात बीड जिल्हा प्रथम असून, नाशिक नंतर तिस-या स्थानावर अनुक्रमे सोलापुर, उस्मानाबाद, सांगली, अहमदनगर, जळगाव, पुणे, यवतमाळ व बुलढाणा दहाव्या क्रमांकावर आहे. या मोहिमेतील अद्यावत माहितीच्या आधारे १० जानेवारी रोजी प्रसिद्ध होणाºया अंतीम मतदार यादी तयार केली जाणार आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकNashikनाशिक