शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकला वडाळापाठोपाठ श्रमिकनगर झोपडपट्टीतील रहिवाशांना स्थलांतरीत करण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 15:48 IST

महापालिका : ११ जानेवारीला सोडत काढण्याचा निर्णय

ठळक मुद्देश्रमिकनगरातील लाभार्थ्यांना चुंचाळे शिवारातील घरकुल योजनेत समाविष्ट करून घेतले जाणारचुंचाळे येथे स्थलांतरीत करण्याऐवजी वडाळा येथे स्थलांतरीत करण्याची मागणी काही लाभार्थ्यांनी केली आहे

नाशिक - महापालिकेने वडाळा पाठोपाठ आता गंजमाळवरील श्रमिनगरमधील लाभार्थी रहिवाशांना स्थलांतरीत करण्याची तयारी चालविली असून येत्या ११ जानेवारीला सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती झोपडपट्टी विभागाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, श्रमिकनगरातील लाभार्थ्यांना चुंचाळे शिवारातील घरकुल योजनेत समाविष्ट करून घेतले जाणार आहे.महापालिकेने मागील महिन्यात वडाळा येथील झोपडपट्टी जमिनदोस्त करण्याची कार्यवाही पार पाडली. वडाळा येथील घरकुल योजनेत लाभ देऊनही रहिवाशांनी आपल्या मूळ झोपड्या सोडल्या नव्हत्या. त्यामुळे महापालिकेने सदर झोपड्या हटविण्यासंबंधी लाभार्थ्यांना वारंवार नोटीसाही बजावल्या होत्या. परंतु, लाभार्थी नोटिशांना बधत नव्हते. अखेर महापालिकेने सुमारे ४०० हून अधिक झोपड्यांवर जेसीबी चालवत संपूर्ण अतिक्रमण हटविले. वडाळानंतर आता महापालिकेने गंजमाळवरील श्रमिकनगर झोपडपट्टीकडे मोर्चा वळविला आहे. श्रमिकनगरातील सुमारे ३०० लाभार्थ्यांना चुंचाळे येथे घरकुले निश्चित करण्यात आलेली आहेत. परंतु, लाभार्थी आपल्या झोपड्या सोडायला तयार नाहीत. त्यामुळे महापालिकेने वडाळाप्रमाणेच बळाचा वापर करण्याची तयारी चालविली असतानाच हळूहळू लाभार्थी स्थलांतरणास तयार होताना दिसून येत आहे. अनेकांनी महापालिकेत स्वत: संपर्क साधून तशी तयारी दर्शविली आहे. त्यानुसार, महापालिकेमार्फत येत्या ११ जानेवारीला सोडत काढली जाणार असून लाभार्थ्यांनी निश्चित केलेल्या यादीनुसार सोबत आवश्यक ती कागदपत्रे आणून सोडतीत सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी केले आहे. दरम्यान, चुंचाळे येथे स्थलांतरीत करण्याऐवजी वडाळा येथे स्थलांतरीत करण्याची मागणी काही लाभार्थ्यांनी केली आहे. परंतु, महापालिका चुंचाळे येथील घरकुल योजनेतच स्थलांतरणावर ठाम आहे.१७५ लाभार्थ्यांची सोडतमहापालिकेने चुंचाळे येथे सर्वात मोठी घरकुल योजना उभारलेली आहे. मागील सप्ताहात चुंचाळे येथील घरकुल योजनेत १७५ लाभार्थ्यांची सोडत काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. चुंचाळे येथे अद्याप सातशेहून अधिक घरकुले रिकामी आहेत. रिक्त घरकुलांमध्येही टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांना स्थलांतरीत करण्यात येणार आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका