शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचा नाशिकला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 01:45 IST

देशपातळीवर अतिरेक्यांच्या वाढत्या कारवाया लक्षात घेता देशांतर्गत सुरक्षा-व्यवस्थेची जबाबदारी पेलण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने महाराष्टÑातील नाशिक व मध्य प्रदेशातील भोपाळ या ठिकाणी दोन सुरक्षा तळ उभारण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी केल्या जाणाºया जागेचा शोधही संपुष्टात आला आहे. नाशिकपासून अवघ्या पंधरा किलोमीटरवर असलेल्या ओढा, सय्यदपिंप्री या दोन्ही गावांच्या सीमेवर सुमारे ६७ एकर जागेवर लवकरच औद्योगिक सुरक्षा दलाच्या तळाचे काम केले जाणार आहे.

नाशिक : देशपातळीवर अतिरेक्यांच्या वाढत्या कारवाया लक्षात घेता देशांतर्गत सुरक्षा-व्यवस्थेची जबाबदारी पेलण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने महाराष्टÑातील नाशिक व मध्य प्रदेशातील भोपाळ या ठिकाणी दोन सुरक्षा तळ उभारण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी केल्या जाणाºया जागेचा शोधही संपुष्टात आला आहे. नाशिकपासून अवघ्या पंधरा किलोमीटरवर असलेल्या ओढा, सय्यदपिंप्री या दोन्ही गावांच्या सीमेवर सुमारे ६७ एकर जागेवर लवकरच  औद्योगिक सुरक्षा दलाच्या तळाचे काम केले जाणार आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे नाशिक येथे तळ करण्यामागे अनेक कारणे देण्यात आली असून, त्यात प्रामुख्याने ओझर व आर्टिलरी सेंटरच्या गांधीनगर या दोन्ही विमानतळांच्या सुरक्षेला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. याशिवाय नाशिकरोडच्या करन्सी नोट प्रेस, मध्यवर्ती कारागृह, एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र, रेल्वे स्थानकाच्याही सुरक्षेचा आढावा मध्यंतरी घेण्यात आल्याने सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने ते संवेदनशील असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्टÑ पोलीस अकादमीची यापूर्वीच लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनेच्या सदस्यांनी रेकी केली असून, सध्या पोलीस अकादमीची सुरक्षा व्यवस्था पोलिसांच्या भरवशावर आहे. नाशिकमधील सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांबरोबरच लगतच्या मुंबई, पुणे, औरंगाबाद या जिल्ह्णात उद्भवलेल्या आपद्परिस्थितीचा सामना करण्यासाठीही केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल कामी येणार आहे. नैसर्गिक आपत्तीचा सामना, पूरपरिस्थिीत बचाव व मदत कार्यासाठीही लष्कराप्रमाणे या दलाचा उपयोग करून घेण्यात येणार आहे. नाशिकपासून जवळच त्यासाठी जागेची निश्चिती करण्यात आली असून, ओढा, सय्यद पिंप्री या दोन्ही ग्रामपंचायतींच्या सीमेवर सुमारे ६७ एकर जागा ताब्यात घेण्यासाठी ३२ कोटी रुपयांचे शासकीय मूल्य भरण्याची तयारीही केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने दर्शविली आहे. मध्यंतरी औद्योगिक सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी या जागेची पाहणी करून आपली पसंतीही प्रशासनाला कळविली आहे. या जागेवर संपूर्ण बटालियनच्या निवासाची, ट्रेनिंगची सुविधा उभारण्यात येणार असून, राज्यात कोठेही गरज पडल्यास या दलाची सहाय्यता घेण्यात येणार आहे. एकाच वेळी १२५० सशस्त्र जवानांची आवश्यकता भासेल त्या ठिकाणी रवानगी करण्यात येईल, असेही सूत्रांनी सांगितले.केंद्रीय गृहमंत्रालयाने काही महिन्यांपूर्वीच देशातील महत्त्वाच्या शहरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने साधारणत: १२५० सशस्त्र जवानांचा समावेश असलेल्या दोन बटालियन कार्यरत ठेवण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी नाशिक व भोपाळ या दोन शहरांची निवड केली आहे. या सुरक्षा दलाचा उपयोग विमानतळ, सागरी पोर्ट, शासकीय महत्त्वाच्या इमारती, आर्टिलरी सेंटर, पुरातत्व खात्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेसाठी करण्याबरोबरच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौºयाची सुरक्षेची जबाबदारीही देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.