नाशिक : शहराच्या किमान तपमानाच्या पाºयामध्ये सातत्याने घसरण सुरूच असून, नाशिककरांना थंडीची तीव्रता अनुभवास येत आहे. मागील चार ते पाच दिवसापांसून किमान तपमानाचा पारा घसरत असल्याने शहरात गारठा वाढला आहे. मंगळवारी (दि. २८) शहराचे किमान तपमान ११ अंश इतके नोंदविले गेले. एकूणच मागील आठवड्याच्या तुलनेत हा आठवडा अधिक थंड राहिला आहे. गेल्या मंगळवारी शहराचे किमान तपमान १८ अंशापुढे होते.शहराच्या किमान तपमानाचा पारा गेल्या मंगळवारपासून (दि. २२) दोन दिवस चढता राहिला; मात्र त्यानंतर पुन्हा किमान तपमानाचा पारा घसरू लागल्याने थंडीची तीव्रता शहरात वाढल्याचे जाणवत आहे.
नाशिक @ ११ : शहरात थंडीचा चढता आलेख; पहाटे धुक्याची दुलई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 20:32 IST
किमान तपमान ११ अंश इतके नोंदविले गेले. एकूणच मागील आठवड्याच्या तुलनेत हा आठवडा अधिक थंड राहिला आहे. गेल्या मंगळवारी शहराचे किमान तपमान १८ अंशापुढे होते.
नाशिक @ ११ : शहरात थंडीचा चढता आलेख; पहाटे धुक्याची दुलई
ठळक मुद्देनाशिककरांना दिवसा उन्हाचा चटका गेल्या वर्षी २८ नोव्हेंबर रोजी किमान तपमानाचा पारा १० अंशापर्यंत घसरला होता.