शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

शनिवारपासून जागतिक बालकामगार विरोधी सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 17:31 IST

राज्याचे कामगार आयुक्त महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या निर्देशानुसार दि.12 ते दि.18 जून दरम्यान जागतिक बालकामगार विरोधी सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

ठळक मुद्देआस्थापनामध्ये 14 वर्षापेक्षा लहान बाल कामगारांना कामावर ठेवणे गुन्हा सहा महिने ते दोन वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा

नाशिक:- जागतिक बालकामगार विरोधी सप्ताह निमित्ताने जिल्ह्यात धाडसत्र राबवून विविध आस्थापनांची तपासणी करण्याबरोबरच अनेकविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती कामगार उपायुक्त विकास माळी यांनी दिली.        राज्याचे कामगार आयुक्त महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या निर्देशानुसार दि.12 ते दि.18 जून दरम्यान जागतिक बालकामगार विरोधी सप्ताह साजरा करण्यात येत आहे.या सप्ताहात कामगार उपआयुक्त विकास माळी,सहायक कामगार आयुक्त सुजित शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली ठक्कर बस स्थानक येथे बाल कामगार विरोधी स्वाक्षरी अभियान,जिल्ह्यातील विविध आस्थापनांना भेटी देऊन बाल कामगार विरोधीबाबत माहिती देऊन दुकाने आणि आस्थापनांच्या ठिकाणी दर्शनी भागात बालकामगार कामावर न ठेवण्याबाबतचे स्टीकर्स लावणे,पत्रके वाटप करणे, कामगार विभागातील अधिकारी कर्मचारी व सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी यांच्यामदतीने जिल्हातील वीटभट्टी, खडीक्रेशर,हॉटेल,दुकाने,चहाटपरी,गॅरेज यासह विविध आस्थापनांवर धाड टाकून तपासणी करणे,हॉटेल असोसिएशन,दुकाने व व्यापारी असोसिएशन यांच्या बरोबर बैठका घेऊन त्यांना सुधारित बालकामगार अधिनियमातील तरतुदींची माहिती देणे,औद्योगिक क्षेत्रातील मालक संघटनांची बैठक घेऊन बालकामगार कामावर न ठेवण्याबाबत सामुदायिक शपथ घेणे व त्यांच्याकडून हमी पत्र घेणे.आदी भरगच्च उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.आस्थापनामध्ये 14 वर्षापेक्षा लहान बाल कामगारांना कामावर ठेवणे गुन्हा आहे.तसेच 14 ते 18 वयोगटातील बालकामगारांना धोकादायक उद्योग व प्रक्रियेतील आस्थापनेत कामावर ठेवणे फौजदारी गुन्हा आहे.बाल कामगार कामावर ठेवल्यास सहा महिने ते दोन वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा किंवा 20 हजार ते 50 हजार रुपये दंड किंवा दोन्हीही शिक्षा मालकास होऊ शकतात. गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास किमान एक ते तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

 

टॅग्स :NashikनाशिकLabourकामगारcollectorजिल्हाधिकारी