शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील ५० बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 16:38 IST

नाशिक : वडाळा-पाथर्डी परिसरातील बेशिस्त रिक्षाचालकांवर वाहतूक विभागाने रविवारी (दि़१४) कारवाई केली़ सुमारे सहा तास सुरू असलेल्या या मोहिमेत सुमारे ५० रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली असून, या कारवाईची माहिती मिळाल्यामुळे की काय या रस्त्यावरील रिक्षाचालक गायब झाले होते़

ठळक मुद्दे बेशिस्त रिक्षाचालक ; वाहतूक विभागाने केली कारवाई

नाशिक : वडाळा-पाथर्डी परिसरातील बेशिस्त रिक्षाचालकांवर वाहतूक विभागाने रविवारी (दि़१४) कारवाई केली़ सुमारे सहा तास सुरू असलेल्या या मोहिमेत सुमारे ५० रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली असून, या कारवाईची माहिती मिळाल्यामुळे की काय या रस्त्यावरील रिक्षाचालक गायब झाले होते़

वडाळा-पाथर्डी रस्त्यालगतच शिवाजीवाडी, विनयनगर, साईनाथनगर, इंदिरानगर, कलानगर, सार्थकनगरसह विविध उपनगरे आहेत़ या उपनगरांमध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक राहत असले तरी लोकसंख्येच्या प्रमाणात आवश्य तितक्या बसफे-या होत नाही़ त्यामुळे शालिमार ते पांडवनगरी या वडाळा-पाथर्डी रस्त्यावर सुमारे ६० ते ७० रिक्षा चालतात़ या रिक्षांमध्ये पाठीमागील सीटवर सहा ते सात आणि चालकाशेजारी दोन ते तीन प्रवासी अशी अवैध व धोकादायक प्रवासी वाहतूक केली जात असल्याची नागरिकांची तक्रार होती़

शहर वाहतूक पोलीस विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले व कर्मचा-यांनी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन गणवेश परिधान न करणारे, वाहन परवाना नसणारे तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणा-या पन्नास रिक्षांवर दंडात्मक कारवाई केली़ वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी समाधान पवार, शंकर दातीर, कानिफनाथ मोटकर, गोकूळ वाबळे यांचा या पथकात समावेश होता़

कायमस्वरूपी मोहीमसाईनाथनगर चौफुली, सावरकर चौक व सार्थकनगर बस थांब्यासमोरील बेशिस्त रिक्षाचालकांवर शहर वाहतूक पोलिसांच्या पथकाने कारवाई केली़ तसेच रस्त्यावर उभ्या राहणा-या विक्रेत्यांच्या गाड्याही हटविण्यात आल्या असून, ही मोहीम कायमस्वरूपी राबविण्यात येणार असल्याचे पोलीस अधिका-यांनी सांगितले़

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसTrafficवाहतूक कोंडी