शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले...
2
IND vs WI : KL राहुलचं नाबाद अर्धशतक; कसोटीत शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जिंकली पहिली ट्रॉफी
3
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पहिल्याच वन-डेमधून 'हे' दोन महत्त्वाचे खेळाडू बाहेर; भारतीय संघाने टाकला सुटकेचा नि:श्वास...
4
दिवाळीच्या साफसफाईत आईला सापडला 'खजिना'; २ हजारांच्या तब्बल २ लाखांच्या नोटा, पण...
5
LG Electronics IPO Listing: बंपर लिस्टिंग, शेअर बाजारात एन्ट्री घेताच प्रत्येक शेअरवर ₹५७५ चा फायदा; एलजी आयपीओनं केलं मालामाल
6
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘मोदी चांगले मित्र आहेत’; बाजूलाच उभे असलेले पाकिस्तानचे शाहबाज शरीफ अवाक, व्हिडीओ व्हायरल
7
दिवाळी २०२५: धन-सुख-समृद्धीची इच्छा पूर्ण होईल, ‘अशी’ करा लक्ष्मी आगमनाची तयारी; शुभच घडेल!
8
दिवाळी २०२५ धमाका: या स्मार्टफोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट! तुम्ही घेण्याच्या विचारात असाल तर... 
9
नेपाळनंतर 'Gen-Z' ने या देशातील सत्ता घालवली; राष्ट्रपती देश सोडून पळून गेले
10
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टीमध्ये ७० अंकांची तेजी; IT आणि मेटल शेअर्स सुस्साट
11
Swami Samartha: पुष्य नक्षत्रावर सुरु करा स्वामीभक्ती, अध्यात्मात मिळेल गती, आयुष्यात होईल दुप्पट प्रगती!
12
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
13
५०० वर्षांनी हंस केंद्र त्रिकोण राजयोग: ९ राशींना बोनस, अकल्पनीय लाभ; भाग्योदय-पैसा-भरभराट!
14
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; दीड वर्षांपूर्वी पळून जाऊन लग्न, लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
15
१ नोव्हेंबरपासून करू शकणार २३९० रुपयांत हवाई प्रवास, या दिग्गज कंपनीनं केली मोठी घोषणा
16
आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन"
17
राष्ट्रीय महामार्गावरील अस्वच्छ शौचालयाचा फोटो पाठवा, Fastag मध्ये ₹१००० रुपये मिळवा; काय आहे हा प्रकार?
18
लोकल लेट झाल्याने बदलापूर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी; गर्दी आवरण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल स्थानकात
19
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
20
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!

कालबाह्य कायद्यामध्ये सुधारणा व्हावी उध्दव ठाकरे:

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 18:14 IST

नाशिक : आजही अनेक ब्रिटिशकालीन कायदे राबविले जात आहेत. आधुनिकतेकडे जात असताना कालबाह्य ठरणाऱ्या कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी कायद्यांचे सिंहावलोकन ...

नाशिक : आजही अनेक ब्रिटिशकालीन कायदे राबविले जात आहेत. आधुनिकतेकडे जात असताना कालबाह्य ठरणाऱ्या कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी कायद्यांचे सिंहावलोकन करण्याची गरज असेल तर आवश्य केले पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.जिल्हा न्यायालयाच्या प्रस्तावित इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. न्यायालयाच्या आवारात झालेल्या या सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, परिवहन मंत्री अनिल परब, न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, न्यायमूर्ती संदीप शिंदे, भारताचे अतिरिक्त महाधिवक्ता एन.एस. नाडकर्णी, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील शेखर नाफडे आदी उपस्थित होते.यावेळी ठाकरे म्हणाले, न्याय वेळेवर मिळत नसल्याची जनतेच्या मनातील भावना मान्य करून बार कौन्सिलने त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी उघडपणे दाखविलेली तयारी अत्यंत सकारात्मक बाब आहे. जलद आणि आधुनिक न्याय देण्यासाठी एक व्यापक विचारमंथन होण्याची आवश्यकतादेखील आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिण्याचे आणि दिशा दाखविण्याचे काम केले आहे. सर्वांना न्याय मिळाला पाहिजे, अशी त्यांनी दिशा दाखविली. त्या दिशेने जाण्यासाठी कायद्यामध्ये काही सुधारणा करण्याची गरज असेल तर ती अंमलात आणली पाहिजे. यासाठी सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, ज्येष्ठ न्यायाधीश, कायदेतज्ज्ञ यांना एकत्र बोलवा. यासाठी एखादी परिषद होऊन त्यामध्ये कायद्याविषयी सकारात्मक बदल होण्याविषयीची ऊहापोह झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.लोकशाहीच्या चार स्तंभांची भूमिकादेखील महत्त्वाची आहे. कायद्याच्या राज्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. जनतेसाठी कायदे झाले पाहिजेत. जनता हीच सर्वोच्च आहे. सर्वसामान्य हा आपल्या व्यवस्थेतील केंद्रबिंदू असला पाहिजे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.वकील परिषदेचे समन्वयक अ‍ॅड. जयंत जायभावे यांनी वकील परिषदेच्या आयोजनाबाबत माहिती दिली. तत्पूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे कोनशिला अनावरण करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा न्यायालयातील हेरिटेज छायाचित्र गॅलरीला भेट देऊन छायाचित्र व तैलचित्रांची पाहणी केली.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालयadvocateवकिल