शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वॉटरकप स्पर्धेत सिन्नरमधील दोन गावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 22:39 IST

नाशिक : दुष्काळी गावे पाणीदार बनविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या वॉटरकप स्पर्धेत सिन्नर तालुक्यातील वडझिरे आणि धोंडबार या दोन गावांत गुरुवारपासून श्रमदान करण्यासाठी अवघे गाव एकत्र येणार आहे. पाण्यासाठी वणवण करावी लागणाऱ्या या गावांतील रहिवाशांनी दुष्काळाशी दोन हात करण्याचा संकल्प केला असून, गावातील नागरिक सर्व व्यवहार बंद करून श्रमदान करणार आहेत. ...

ठळक मुद्देआज श्रमदान : पाणी अडविण्यासाठी येणार तुफानअवघ्या गावातून श्रमदानाचे तुफान

नाशिक : दुष्काळी गावे पाणीदार बनविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या वॉटरकप स्पर्धेत सिन्नर तालुक्यातील वडझिरे आणि धोंडबार या दोन गावांत गुरुवारपासून श्रमदान करण्यासाठी अवघे गाव एकत्र येणार आहे. पाण्यासाठी वणवण करावी लागणाऱ्या या गावांतील रहिवाशांनी दुष्काळाशी दोन हात करण्याचा संकल्प केला असून, गावातील नागरिक सर्व व्यवहार बंद करून श्रमदान करणार आहेत. सकाळी ७ वाजेपासून या श्रमदानाला प्रारंभ होणार आहे.अभिनेते आमीर खान यांच्या बहुचर्चित वॉटरकप स्पर्धेमध्ये राज्यातील तीनशेपेक्षा अधिक गावांनी सहभाग घेतला आहे. वर्षानुवर्षे गावातील पाण्याचे स्रोत बंद झाल्याने तसेच पाणी वाहून जात असल्याने राज्यातील असंख्य गावे दुष्काळग्रस्त आहेत. या गावांना पाणीदार गाव बनविण्यासाठी गावामध्येच श्रमदानाची भावना निर्माण करून नागरिकांना पाणीदार गावासाठी प्रवृत्त करण्याची आमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनची योजना आहे. अगोदर गावाने पाण्यासाठी उभे राहावे आणि नागरिकांना पाण्याचे महत्त्व पटावे यासाठी गावकºयांना या मोहिमेत सहभागी करून घेतले जात आहे.या मोहिमेत सिन्नर तालुक्यातील वडझिरे, धोंडबार या गावांमधील नागरिक श्रमदान करणार असून, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य, शासकीय अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी सहभागी होणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते हेदेखील या मोहिमेत सहभागी होऊन ग्रामस्थांना पाणी मोहिमेबाबत मार्गदर्शन करणार आहेत. ग्रामस्थांच्या श्रममोहिमेतून दुष्काळाचा शाप पुसण्यासाठी, नवा इतिहास घडविण्यासाठी अवघ्या गावातून श्रमदानाचे तुफान आले पाहिजे, या भूमिकेतून गिते हे ग्रामस्थांचे मनोबल उंचावणार आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद