शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अनुदान वाटपात ‘अवकाळी’ परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 17:52 IST

गेल्यावर्षी जून-जुलैमध्ये झालेली अतिवृष्टी आणि आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतीव्यवसायाचे गणित पूर्णपणे बिघडले. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसल्याने ...

गेल्यावर्षी जून-जुलैमध्ये झालेली अतिवृष्टी आणि आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतीव्यवसायाचे गणित पूर्णपणे बिघडले. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसल्याने साहजिकच शासकीय मदतीचे पॅकेजही मिळाले. खरेतर डिसेंबरअखेर शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीचा निधी पोहोचणे अपेक्षित होते, मात्र ऐनवेळी निधी वितरण प्रणालीत बदल करण्यात आला आणि तहसीलपातळीवरील निधी एकाच बॅँकेच्या माध्यमातून शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शेतकºयांना मिळणारी नुकसानभरपाईची प्रक्रिया संथ वाहताना दिसते.शेतकºयांपर्यंत मदतीचा निधी पोहचविण्यासाठी महसूल, कृषी आणि विमा कंपन्यांचे प्रतिनिधी असे सारेच कामाला लागले असतानाही शेतकºयांकडून निधी वितरण प्रक्रियेतील तक्रारी कमी झालेल्या नाहीत. यावरून शेतकºयांच्या मदतनिधीतील कासवगतीची प्रचिती येते. जिल्हाधिकाºयांकडून घेण्यात येणाºया आढावा बैठकीनंतरही वितरणप्रणालीची दिरंगाई कमी झालेली नाही. याउलट जिल्हा प्रशासनाकडून बॅँकेला देण्यात येणारी माहिती मराठीत असल्याने संगणकीय भाषा मात्र इंग्रजीप्रणालीची असल्यामुळे जिल्हा यंत्रणेला मराठी माहितीचे रूपांतर इंग्रजी भाषेत करण्यासाठी वेळ द्यावा लागत आहे.अवकाळी पावसाच्या पहिल्या मदतीचा टप्पा तहसील यंत्रणेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आला. सुमारे १८१ कोटींच्या मदतनिधीची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामुळे दुसºया टप्प्यातील ३६१ कोटींच्या मदतनिधी वाटपासाठी रोडमॅप तयार झाल्याने अडचण येण्याचे कारण नाही. अशी यंत्रणा सज्ज असताना अचानक एकाच बॅँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील अन्य बॅँकांमधील शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली ती अजूनही सुरूच आहे. जिल्ह्यातील अवकाळी नुकसानग्रस्त शेतकºयांना राज्य शासनाकडून दोन टप्पे मिळून ५७८ कोटी १३ लाखांचा निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी ५ लाख १० हजार शेतकºयांना ४५५ कोटी ५५ लाखांचे अनुदान वाटप झाले आहे. एकूण प्राप्त निधीपैकी ७८ टक्के इतकेच निधीचे वाटप झाले आहे.जिल्ह्यात बागलाण, कळवण, दिंडोरी, देवळा व येवला या तालुक्यांमध्ये ७० टक्क्यांपर्यंत मदत वाटप झाली आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये मदत वाटपाचे प्रमाण हे साठ टक्क्यांपेक्षा कमी आहे. आतापर्यंत ५७८ कोटी १३ लाख २९ हजार रु पयांच्या अनुदानापैकी ४५५ कोटी २५ लाख अनुदानाचे वाटप पूर्ण झाले आहे.अनुदान वाटपाला गती येण्यासाठी जिल्हाधिकाºयांना पुन्हा एकदा अल्टिमेटम दिला असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती आहे त्यापेक्षा वेगळी आहे. बांधावरील वाद, शेतातील भाऊबंदकीच्या वादामुळे नुकसानभरपाईच्या संदर्भात खासगी प्रश्नही दुर्लक्षित करून चालणार नाही. आता जिल्हाधिकाºयांनी १५ जानेवारीचा अल्टिमेटम दिला आहे. मात्र अवघ्या एक-दोन दिवसात वाटप यंत्रणेत सुरळीतपणा येईल का? हा खरा प्रश्न आहे. शासकीय काम आणि सहा महिने थांब असे म्हणण्याची वेळ शेतकºयांवर येऊ नये म्हणजे झाले...

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी