शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

आषाढी एकादशीसाठी राज्यातून ३ हजार बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 18:31 IST

नाशिक : श्रीक्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने पंढरपूर यात्रेसाठी नियोजित बसफेऱ्यांव्यतिरिक्त सुमारे तीन हाजर ७२४ ...

ठळक मुद्देएस.टी. महामंडळ: सहाही प्रदेशातून बसेसचे नियोजन

नाशिक: श्रीक्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने पंढरपूर यात्रेसाठी नियोजित बसफेऱ्यांव्यतिरिक्त सुमारे तीन हाजर ७२४ बसेसचे नियोजन केले आहे. याबाबतच्या सुचना महामंडळाच्या सर्व प्रादेशिक विभागांना देण्यात आल्या असून त्यांच्याकडून अतितरिक्त बसेस मागविण्यात आलेल्या आहेत.आषाढी एकादशी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाने जय्यत तयारी केली असून त्याबाबतचे नियोजन राज्यपातळीवर केली आहे. श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेसाठी नियोजित बसफेºयांव्यतिरिक्त सुमारे तीन हाजर ७२४ बसेसचे नियोजन केले असून महाराष्टÑात येणाºया लाखो भाविक प्रवशांना सुरक्षित सेवा देण्यासाठी एस.टी. महामंहळाचे सुमारे पाच हजार चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी व अधिकारी पंढरपूर येथे तैनात करण्यात येणार आहे. येत्या १० ते १६ जुलै या कालावधीत महामंडळच्या कर्मचºयांवर प्रवासी वाहतुकीची मोठी जबाबदारी असणार आहे.पंढरपुरची आषाढी यात्रा हा महाराष्टÑातील सर्व सामान्य जनतेचा जिव्हाळ्याची आणि भावनिक नाते सांगणारी यात्रा आहे. या यात्रेला मोठी परंपरा आणि धार्मिक, पारंपरिक महत्व असल्यामुळे भाविकांची गर्दी देखील मोठी असते. या भाविक प्रवाशांच्या भावनेचा विचार करून महामंडळाने राज्यभरातून बसेसचे नियोजन केले आहे. भाविकांना त्यांच्या गावातून थेट पंढरपूरला घेऊन जाण्याची योजना आहे. त्याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी ग्रुप बुकींगची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. ५० ते ६० प्रवाशी एकत्र मिळाल्यास त्यांना त्यांच्या गावातून घेऊन जाण्याची व्यवस्था महामंडळ करू शकणार आहे.पंढरपूर यात्रेसाठी औरंगाबाद प्रदेशाच्या १०९७, पुणे प्रदेशाच्या १०८०, नाशिक प्रदेशाच्या ६९२, अमरावती ५३३, मुंबई २१२ तर नागपूर प्रदेशाच्या ११० बसेसचे अतिरिक्त नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकPublic Transportसार्वजनिक वाहतूक