नाशिक : जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झाली असे वाटत असतानाच मध्येच दडून बसणारा पाऊस, तर कधी धो-धो बरसणाऱ्या तालुक्यात दुसºया दिवशी लख्ख सूर्यप्रकाश अशा विचित्र वातावरणाचा अनुभव सध्या नाशिककरांना येत आहे. रविवारी (दि.२१) त्र्यंबकेश्वर वगळता सर्वच ठिकाणी चांगला पाऊस सुरू असताना सोमवारी (दि.२२) मात्र सहा तालुक्यांमध्ये केवळ रिमझिम पाऊस सुरू होता. अनेक तालुक्यांमध्ये तर चांगलाच सूर्यप्रकाश पडला होता. हवामान खात्याचे सर्व अंदाज गुंडाळून जिल्ह्यात पावसाचा सुरू असलेला खेळ धरणाच्या पाण्याची चिंता वाढविणारा ठरत आहे.जिल्ह्यात उशिरा आगमन झालेल्या मान्सूनमुळे पावसाची अनिश्चितता अजूनही कायम आहे. गेल्या दि. ७ आणि ८ जुलै रोजी जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात आले होते. दुष्काळाची झळ सोसणाºया तालुक्यांमध्येही पावसाच्या सरी बरसल्याने नदी, नाले वाहू लागले तर दोनच दिवसांच्या पावसाने धरणांची पातळीदेखील वाढली. यामुळे आता पावसाने जोरधरला असे वाटत असताना पुन्हा दडून बसलेल्या पाऊन अधूनमधून डोकावत असतो तर कधी जोरदार हजेरी लावून परतत आहे. जिल्ह्यात पावसाच्या या लहरीपणामुळे मात्र शेतकरी पीकाविषयी साशंकदेखील झाले आहेत. पेरणीसाठी पूरक असलेला पाऊस झाल्यामुळे एकीकडे समाधान असले तरी पावसाच्या अनिश्चिततेचा फटका याच पिकांच बसू नये, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करताना दिसत आहेत. शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी अपेक्षित पाऊस होऊ न शकल्याने पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांचा हिरमोडही झाला. या महिनाभरात त्र्यंबकेश्वरसह धरणक्षेत्रातदेखील पाऊस नसल्यामुळे जुलैच्या मध्यावरच त्र्यंबकला निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे येथील व्यापार, व्यावसायिकांमध्ये चिंता दिसून आली.
जिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 15:57 IST
नाशिक : जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झाली असे वाटत असतानाच मध्येच दडून बसणारा पाऊस , तर कधी धो-धो बरसणाऱ्या ...
जिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ सुरूच
ठळक मुद्देकोरडे तालुके : कधी धुवाधार, तर कोरडेठाक