शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मालधक्क्यावरील माथाडींची सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 15:22 IST

नाशिक  : नाशिकरोडच्या रेल्वे मालधक्क्यावर माथाडी कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात नसल्याचे चित्र आहे. कामगार, त्यांचे कुटुंब आणि समाजात ...

ठळक मुद्देकोरोना प्रादुर्भाव : प्रतिबंधात्मक साधनांची मागणी

नाशिक : नाशिकरोडच्या रेल्वे मालधक्क्यावर माथाडी कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात नसल्याचे चित्र आहे. कामगार, त्यांचे कुटुंब आणि समाजात कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी माथाडींना मास्क, हॅँडग्लोज, सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी रिपब्लिकन माथाडी कामगार संघटनेचे नेते रामबाबा पठारे यांनी केली आहे.कोरोनामुळे सध्या प्रवासी रेल्वेगाड्या १४ एप्रिलपर्यंत बंद आहेत. मात्र, देशात अन्नधान्य, इंधन अशा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू रहावा म्हणून मालगाड्या धावतच आहेत. नाशिकरोडला मालधक्क्यावर मालगाड्या येतात. एक रेल्वेगाडी (रॅक) सुमारे ५६ डब्यांची असते. त्यात देशभरातून धान्य, सीमेंट आदी येते. सुमारे दोनशे ते तीनशे माथाडी धान्य उतरविण्याचे काम करतात. ट्रकमध्ये ही पोती भरून ती नाशिकरोडच्या सरकारी गोदामात नेली जातात. तेथून आदेशानुसार ती शहरात वितरित केली जातात. शुक्रवारी फूड कार्पोरेशन आॅफ इंडिया (एफसीआय) या सरकारी संस्थेचा रॅक नाशिकरोडला आला. त्यात २१ डब्यांमधून तांदूळ आले होते. ते सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत नाशिकरोडच्या गुदामात उतरविण्यात आले. तेथून त्याचे वितरण शहर व जिल्ह्यात होणार आहे. तांदूळ मालगाडीतून उतरवल्यानंतर तीस ते चाळीस ट्रकने ८० ते ९० फेऱ्या केल्या. सुमारे दीडशे माथाडी कामगारांनी हा माल रेल्वेगाडीतून उतरवून ट्रकमध्ये भरला. मात्र, या कामगारांना मास्क, सॅनिटायझर, हॅँडग्लोज असे काहीच नव्हते. मालगाडीतील माल देशभरातून येतो. त्यामुळे माथाडींमध्ये कोरोनाचा फैलाव होण्याची भीती आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे असल्याचे माथाडींचे म्हणणे आहे. दोन दिवसांपूर्वीदेखील जीवनावश्यक धान्य उतरवले होते. तेव्हादेखील कामगारांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आली नव्हती. एफसीआय मनमाड, सेंट्रल वेअर हाऊन्सिंग कार्पोरेशन, विविध कंत्राटदार यांनी योग्य ती काळजी घेण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :NashikनाशिकMarket Yardमार्केट यार्ड