शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव तुकड्यांवरील शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 16:19 IST

नाशिक : राज्यातील अनुदानित शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. अशा अनुदानित शाळांमधील नैसर्गिक ...

ठळक मुद्देनाशिक : शिक्षकांना मान्यताच नसल्याने उपासमारीची वेळ

नाशिक : राज्यातील अनुदानित शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. अशा अनुदानित शाळांमधील नैसर्गिक वाढीव तुकड्यांवर नियुक्त शिक्षक मात्र वर्षानुवर्ष विनावेतन काम करीत असून, त्यांना कोणतेही संरक्षण नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. हा प्रश्न केवळ विनाअनुदानित तुकड्यांच्याबाबतीतच आहे असे नाही तर विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांचीही अशीच परिस्थिती आहे.राज्यात सन २००० पासून कायम विनाअनुदानित शाळांचे धोरण सुरू झाले. या धोरणातील कायम हा शब्द काढून टाकावा यासाठी शिक्षण संस्थाचालकांनी व्यापक प्रयत्न केल्यानंतर २००९ मध्ये या धोरणातील ‘कायम’ हा शब्द काढून टाकण्यात आला. विनाअनुदानित शाळांमध्ये नियुक्त करण्यात आलेले शिक्षक आजही विनावेतन काम करीत असून, काही संस्थाचालकांकडून शिक्षकांना तुटपुंजे मानधन दिले जात आहे. शाळा विनाअनुदानित असल्यामुळे शिक्षकांची पदेदेखील मंजूर नसल्याने या शिक्षकांच्या नोकºयांना संरक्षणदेखील मिळत नाही. त्यामुळे गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून विनावेतन काम करणाºया शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे.अनुदानित शाळांना शासनाचे अनुदान मिळतेच शिवाय आता तर शिक्षकांना सातवा वेतन आयोगदेखील लागू करण्यात आलेला आहे. परंतु याच अनुदानित शाळांमधील नैसर्गिक वाढीच्या तुकडीवर नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांच्या पदरी मात्र निराशाच आहे. अनुदानित शाळांच्या शिक्षकांप्रमाणे काम करूनही नैसर्गिक वाढीच्या तुकडीवर शिक्षकांना कामाचा दाम दिला जात नाही ही शोकांतिका आहे. राज्यात अशाप्रकारे नैसर्गिक वाढीच्या तुकडीवर काम करणाºया शिक्षकांची संख्या साडेचार हजार इतकी आहे.अनुदानित शाळांना जोडून असलेल नैसर्गिक वाढीव वर्ग तुकड्यांवरील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांना पात्र ठरविण्यासाठी संस्थांकडून रोष्टर आणि शासनाच्या मान्यतेचा प्रश्न पुढे केला जातो. त्यामुळे वाढीव तुकड्यावरील शिक्षक अधिकारापासून वंचित आहेत. विशेष म्हणजे विनावेतन काम करणाºया वाढीव तुकडीवर बहुतांश मागासवर्गीय उमेदवार असल्याने त्यांचा आवाज अद्याप शासनाला ऐकू जात नसल्याचा आरोपही या शिक्षकांकडून केला जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण