nashik,the,bus,should,start,for,adgaon,via.old,zakat | जुना जकातमार्गे आडगावसाठी बसचा पर्याय
जुना जकातमार्गे आडगावसाठी बसचा पर्याय

ठळक मुद्देाहामंडळाला निवेदन : बस बंद केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय


नाशिक : आडगाव येथील पूल धोकादायक असल्याचा फलक महापालिकेने लावल्यामुळे महामंडळाने आडगावातून जाणाऱ्या येणाºया बसेस बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. सदर सेवा पर्यायी मार्गाने सुरू करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी महामंडळाच्या आगारप्रमुखांना निवेदन दिले आहे.
आडगावातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून, नोकरदार वर्ग, विद्यार्थी महिला मोठ्या संख्येने बसने प्रवास करतात. परंतु बस बंद झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. सुकणे, ओझर मिग, मोहाडी, सय्यद पिंप्री, विंचूर गवळी, खेरवाडी, चांदोरी, सायखेडा आदी मार्गावरच्या फेºया करताना आडगाव मेडिकल कॉलेज फाट्यावरून तसेच सीबीएस-आडगांव कडे येताना मुंबई-आग्रा रोड ओलांडावा लागतो. यामुळे महिला व विद्यार्थी यांना त्रास सहन करावा लागत आहे. वयोवृद्धांनाही प्रवास करताना त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर शिवसेना उपमहानगरप्रमुख सुनील जाधव, मल्हारी मते, पोलीसपाटील एकनाथ पाटील मते, संघटक पोपट शिंदे, सुरेश मते, तुषार शिंदे, ऋषिकेश शिंदे, राहुल सूर्यवंशी, प्रसास माळोदे, महेश मते आदी उपस्थित होते. दरम्यान, क्रांतिवीर छावा सेनेकडूनदेखील याप्रकरणी निवेदन देण्यात आले.


Web Title: nashik,the,bus,should,start,for,adgaon,via.old,zakat
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.