शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

झाडे उन्मळून पडल्याने यंत्रणेवर ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 19:00 IST

नाशिक : गेल्या शनिवारपासून सुरू असलेल्या पावसाने रविवारी चांगलाच जोर धरला आणि दिवसभर जोरदार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी झाडे ...

ठळक मुद्देअनेक मार्ग बंद : आपत्कालीन कामांना विलंब

नाशिक : गेल्या शनिवारपासून सुरू असलेल्या पावसाने रविवारी चांगलाच जोर धरला आणि दिवसभर जोरदार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर जुने नाशिक भागातील काही ठिकाणी वाड्यांच्या भिंती कोसळल्याने आपात्कालीन परिस्थिती उद्भवली होती. अशा परिस्थितीत पडलेली झाडे तोडण्यासाठी ठेकेदाराकडे असलेले मनुष्यबळ इतर आपात्कालीन कामांमध्ये अडकून पडल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांवर तासंतास झाडे तशीच पडून होती.पावसाळ्यात रस्त्यावर पडलेली तसेच धोकादायक स्थितीतील झाडे तोडण्यासाठी महापालिकेच्या वतीने ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आलेली आहे. रविवारी शहर परिसरात अनेक ठिकाणी झाडे पडल्यामुळे साहजिकच ठेकेदाराच्या यंत्रणेकडूनच रस्त्यावर आडवी पडलेली झाडे तोडण्यासाठी लाकूडतोड्यांची मदत घ्यावी लागते. मात्र शहरात अनेक ठिकाणी झाडे पडल्यामुळे ठेकेदाराकडील लाकूड तोडणारी माणसे कामात अडकली असल्यामुळे शहराती काही भागांत पोहचण्यात काहीसा विलंब झाल्याने तासंतास झाडे पडून होती. त्यामुळे अशा मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. उपनगर येथील म्हसोबा मंदिरासमोर पडलेल्या झाडामुळे संपूर्ण रस्ता बंद झाला होता. परंतु जोपर्यंत कर्मचारी झाड तोडण्यासाठी येत नाहीत तोपर्यंत वाट पाहाण्याशिवाय पर्याय नव्हता. ठेकेदाराकडील लाकूड तोडणारी माणसे जुने नाशिकमधील आपत्कालीन कामात अडकल्याने झाड बाजूला करण्यास विलंब झाल्याचे नगरसेविका सुषमा पगारे यांनी सांगितले. दोन तासांनंतर रस्ता मोकळा करण्यात आला.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस