शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तींना अजूनही विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 18:32 IST

नाशिक : विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेली शिष्यवृत्ती विलंब होण्याचा प्रकार अद्यापही सुरूच असून, यावर्षी शिष्यवृत्तीचे प्रस्ताव अजूनही पूर्णत्वास येऊ ...

ठळक मुद्देपुन्हा मुदतवाढ : प्रकरणे प्रलंबित राहिल्यास आयुक्त जबाबदार

नाशिक : विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेली शिष्यवृत्ती विलंब होण्याचा प्रकार अद्यापही सुरूच असून, यावर्षी शिष्यवृत्तीचे प्रस्ताव अजूनही पूर्णत्वास येऊ शकलेले नाही. त्यामुळे अशा प्रकारचे प्रस्ताव सादर करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली असून, याप्रकरणाची जबाबदारी समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांकडे सोपविण्यात आली आहे.विशिष्ट जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व फ्रीशीप योजनेंतर्गत अर्ज महाविद्यालयाच्या माध्यमातून समाजकल्याण विभागाकडे मंजुरीसाठी पाठविले जातात. परंतु अशा प्रकारचे शिष्यवृत्तीचे प्रस्ताव अनेकदा महाविद्यालयीन आणि समाजकल्याण विभागातच पडून राहतात. त्यावर अपेक्षित निर्णय आणि निर्धारित वळेत प्रस्ताव पाठविण्याची कार्यवाही होत नसल्याने विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहत आहेत. मागील दोन वर्षांपासून याच कारणास्तव शिष्यवृक्ती मिळू शकलेली नाही.शिष्यवृत्तीचे प्रस्ताव फेब्रुवारी महिन्यातच निकाली काढण्यासंदर्भात समाजकल्याण विभागाला शासनाने कळविले होते. मात्र तरीही प्रकरणे दाखल होण्यास विलंब होत असल्याने प्रस्ताव सादर करण्याची मुदत वाढवून देण्याची विनंती शासनाला करण्यात आली होती. त्यानुसार आता ३१ मार्च अखेर शिष्यवृत्तीचे प्रलंबित प्रस्ताव सादर करण्याचा ‘अल्टिमेटम’ देण्यात आला आहे.आता देण्यात आलेली मुदत अंतिम असून प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारचा विलंब झाल्यास समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त तसेच संबंधित महाविद्यालयांना जबाबदार धरले जाणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण