शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षणासाठी समता परिषदेचे उद्या राज्यभर रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 17:07 IST

खिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची बैठक बुधवारी भुजबळ फार्म येथील कार्यालयात पार पडली. या बैठकीत सर्व ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट करीत राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देबैठकीत निर्णय: जनगणनेचीही आग्रही मागणीनाशिकमध्ये सकाळी ११ वाजेच्या सुमारास द्वारका चौकात रास्ता रोको

नाशिक : ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आल्याने आरक्षण वाचविण्यासाठी समता परिषदेच्या वतीने आज, गुरुवारपासून राज्यभर रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा निर्णय नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला. आरक्षणाबरोबरच जनगणनेसह विविध मागण्यांसाठी ओबीसींच्या सर्व संघटनांना सोबत घेऊन आंदोलन केले जाणार असल्याचे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी सांगितले.अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची बैठक बुधवारी भुजबळ फार्म येथील कार्यालयात पार पडली. या बैठकीत सर्व ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट करीत राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत खैरे यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. ओबीसी समाजाचे नेते राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ हे ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयीन लढाई लढत आहेत, तर समता परिषदेच्या वतीने रस्त्यावरची लढाई लढली जाणार आहे. राज्यातील सर्व ओबीसी संघटनांना सोबत घेऊन जिल्हा, शहर व तालुका पातळीवर रास्ता रोको आंदोलन केले जाणार असल्याचे खैरे यांनी सांगितले. दरम्यान, नाशिकमध्ये सकाळी ११ वाजेच्या सुमारास द्वारका चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनात ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचविण्यासाठी ओबीसींच्या जागेवर लढणारे सर्व राजकीय नेते आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांनी यावेळी दिली.बैठकीस संतोष सोनपसारे, संतोष गायकवाड, समाधान जेजुरकर, अंबादास खैरे, कविता कर्डक, तानाजी जायभावे, लक्ष्मण जायभावे, समाधान जाधव, अरुण काळे, बाळासाहेब जानमाळी, मंदाकिनी जाधव, आशा भंदुरे, अरुण नेवासकर, विजय राऊत, दिलीप तुपे, आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :NashikनाशिकChagan Bhujbalछगन भुजबळ