ओबीसी आरक्षणासाठी समता परिषदेचे उद्या राज्यभर रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:59 PM2021-06-16T16:59:25+5:302021-06-16T17:07:06+5:30

खिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची बैठक बुधवारी भुजबळ फार्म येथील कार्यालयात पार पडली. या बैठकीत सर्व ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट करीत राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

nashik,stop,the,statewide,road,of,equality,council,for,OBC,reservation today | ओबीसी आरक्षणासाठी समता परिषदेचे उद्या राज्यभर रास्ता रोको

ओबीसी आरक्षणासाठी समता परिषदेचे उद्या राज्यभर रास्ता रोको

Next
ठळक मुद्देबैठकीत निर्णय: जनगणनेचीही आग्रही मागणीनाशिकमध्ये सकाळी ११ वाजेच्या सुमारास द्वारका चौकात रास्ता रोको



नाशिक : ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आल्याने आरक्षण वाचविण्यासाठी समता परिषदेच्या वतीने आज, गुरुवारपासून राज्यभर रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा निर्णय नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला. आरक्षणाबरोबरच जनगणनेसह विविध मागण्यांसाठी ओबीसींच्या सर्व संघटनांना सोबत घेऊन आंदोलन केले जाणार असल्याचे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी सांगितले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची बैठक बुधवारी भुजबळ फार्म येथील कार्यालयात पार पडली. या बैठकीत सर्व ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट करीत राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत खैरे यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. ओबीसी समाजाचे नेते राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ हे ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयीन लढाई लढत आहेत, तर समता परिषदेच्या वतीने रस्त्यावरची लढाई लढली जाणार आहे. राज्यातील सर्व ओबीसी संघटनांना सोबत घेऊन जिल्हा, शहर व तालुका पातळीवर रास्ता रोको आंदोलन केले जाणार असल्याचे खैरे यांनी सांगितले. दरम्यान, नाशिकमध्ये सकाळी ११ वाजेच्या सुमारास द्वारका चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनात ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचविण्यासाठी ओबीसींच्या जागेवर लढणारे सर्व राजकीय नेते आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांनी यावेळी दिली.
बैठकीस संतोष सोनपसारे, संतोष गायकवाड, समाधान जेजुरकर, अंबादास खैरे, कविता कर्डक, तानाजी जायभावे, लक्ष्मण जायभावे, समाधान जाधव, अरुण काळे, बाळासाहेब जानमाळी, मंदाकिनी जाधव, आशा भंदुरे, अरुण नेवासकर, विजय राऊत, दिलीप तुपे, आदी उपस्थित होते.

 

Web Title: nashik,stop,the,statewide,road,of,equality,council,for,OBC,reservation today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.