शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 18:44 IST

गंगापूर : नाशिक जिल्हा बॅँकेने ऐन दुष्काळी परिस्थिीत कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या उभ्या शेतीचे लिलाव करण्यास सुरु वात केली असून, नाईकवाडी ...

ठळक मुद्देनिवेदन : शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

गंगापूर : नाशिक जिल्हा बॅँकेने ऐन दुष्काळी परिस्थिीत कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या उभ्या शेतीचे लिलाव करण्यास सुरु वात केली असून, नाईकवाडी येथील शेतकºयांच्या शेतीचा नऊ एकर जमिनीचा गेल्या ११ रोजी लिलाव केला, आता पुन्हा याच क्षेत्राचा लिलाव करण्याची नोटीस संबंधित शेतकºयांना काढल्याने संतप्त शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडेकर यांच्याकडे निवेदन सादर करून जिल्हा बॅँकेच्या या जबरदस्तीच्या शेती लिलावाचा तीव्र निषेध केला आहे.भविष्यात जिल्हा बॅँकेच्या या जबरदस्ती शेती लिलावाविरोधात तीव्र आंदोलन करण्याची वेळ शेतकरी संघटनांवर आणू नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शालेय शुल्क सरकारने माफ केले आणि अशा परिस्थिती जमिनीचे लिलाव होत असतील तर ते योग्य नाही, असे शेतकºयांचे म्हणणे आहे.जिल्हाधिकाºयांना निवेदन दिल्यानंतर शेतकºयांच्या शिष्टमंडळाने थेट जिल्हा बॅँकेचे चेअरमन केदा आहेर यांची भेट घेऊन शेतकºयांच्या अडचणी मांडल्या. शेतकरी कर्ज बुडवत नाही मात्र यंदा दुष्काळ आहे, शेतीमालाला भाव नाही, पाऊस कमी आहे व त्यात शेतकरी नाशिक जिल्ह्यात आत्महत्या करीत आहे, अशा परिस्थितीत सक्तीची वसुली योग्य नसल्याचे शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे.जिल्हा बॅँक ही अडचणीत आल्याचे कारण नोटबंदी आहे. यावेळी शेतकºयांनी जिल्हा बॅँकेत चेअरमन व अधिकाºयांना थेट सवाल करताना शेतकºयांच्या सध्याच्या स्थितीतील सत्य परिस्थती काय आहे याबाबतची माहिती दिली. यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बॅँकेकडे असलेल्या ठेवी, शेतकºयांचे शेअर्स किती? असा सवाल करताना बॅँक अडचणीत येण्याचे कारणे शोधा, असा ही सवाल केला. शासनाच्या धोरणात शेतकरी भरडला जात असल्याचा आरोप करून दुष्काळात शेती लिलाव थांबवा, असे थेट आवाहन यावेळी जिल्हा बैंकेला करण्यात आले. याप्रसंगी नाईकवाडी येथील कर्जबाजारी शेतकरी खंडेराव भागुजी पाटील यांच्या जमिनीचे फेरलिलाव नोटीस घेऊन परिवाराने जिल्हाधिकारी व जिल्हा बँक गाठून आपली कैफियत मांडली.यावेळी शेतकरी खंडेराव भागुजी कातडं त्यांच्या परिवारासह शेतकरी संघटनेचे भगवान बोराडे, शंकर पुरकर, रामनाथ ढिकले, प्रहारचे शरद शिंदे, अर्जुन तात्या बोराडे, शांताराम बोराडे, बापूसाहेब पगारे, प्रकाश चव्हाण यांसह अनेक शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी