शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी गावांसाठी एसटीची जलसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 18:36 IST

नाशिक : केरळ पूरग्रस्तांसाठीची आर्थिक मदत, दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना पास सवलत तसेच दुष्काळग्रस्तांसाठी विशेष भरती अशी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या ...

ठळक मुद्देसिन्नर तालुक्यात टॅँकर्स : टॅँकर्सची संख्या वाढण्याची शक्यता

नाशिक : केरळ पूरग्रस्तांसाठीची आर्थिक मदत, दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना पास सवलत तसेच दुष्काळग्रस्तांसाठी विशेष भरती अशी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाने आता राज्यातील नऊ दुष्काळी जिल्ह्यांमधील काही निवडक गावांना पाणीपुरवठा सुरू केला आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील तीन गावांमध्ये महामंडळाकडून सध्या पाणीपुरवठा केला जात आहे.गाव तिथे एस.टी. असे ब्रीद मिरवणाºया महामंडळाने दुष्काळी गावात पोहोचून जलसेवा सुरू केली आहे. दुष्काळामुळे अनेक गावांना पाणी मिळणे कठीण झाले असून, पाण्यासाठी भटकंती करणाºया काही गावांना महामंडळाने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी महामंडळाने सामाजिक बांधिलकी म्हणून गेल्या १९ मेपासूनच नऊ जिल्ह्यांतील १९ गावांमध्ये टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. नाशिक जिल्ह्यातील मनेगाव, पाटुळे आणि रामनगर या गावांना एस.टी. टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करीत आहे. याबरोबरच औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, सातारा, अहमदनगर, बुलढाणा प्रत्येकी तीन टॅँकर याप्रमाणे गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. दुष्काळी गावांची माहिती घेऊन पाणीपुरवठा करणे कुठे शक्य आहे आणि पाण्याची उपलब्धता कशी होऊ शकेल, याचा अभ्यास करूनच गावांची निवड करण्यात आली असून, पाण्याचा अपव्यय न होता वेळेत पाणीपुरवठा करण्यावर भर देण्यात आला आहे.ज्या ठिकाणी औद्योगिक वसाहत किंवा नगरपालिका हद्दीत पाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणाहून पाणी उचलण्यात येत आहे. शिवाय जेथे दोन्ही व्यवस्था उपलब्ध नाहीत अशावेळी शहरालगत खासगी टॅँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकBus Driverबसचालक