शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्यांची मतदान सुटीवरून नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 18:25 IST

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील सर्व डेपो आणि कार्यशाळांच्या प्रमुखांना मतदानासाठी सुटीच्या नियोजनाबाबतचे पत्र पाठविले ...

ठळक मुद्देराज्य मंडळाचे आदेश : अत्यावश्यक सेवेचा सोयीने अर्थ

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील सर्व डेपो आणि कार्यशाळांच्या प्रमुखांना मतदानासाठी सुटीच्या नियोजनाबाबतचे पत्र पाठविले असून, यामध्ये कार्यालयीन कर्मचाऱ्यांना सुटी जाहीर करून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना अर्धा ते दोन तासांच्या सुटीचे नियोजन सुचविले आहे. मात्र अत्यावश्यक सेवेमध्ये टायर प्रकल्प आणि कार्यशाळा कर्मचाऱ्यांना समाविष्ट केल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.मतदानाच्या दिवशी कर्मचाºयांना मतदान करता यावे या हेतूने राज्य परिवहन महामंडळाने विभागनियंत्रकांना सुटीच्या नियोजनाबाबत कळविले आहे. त्यानुसार कार्यालयीन सर्व कर्मचाºयांना पूर्ण दिवसाची सुटी देण्यात आलेली आहे, तर अन्य कर्मचाºयांना मतदानासाठी अर्धा ते दोन तासांची सूट देण्यात आलेली आहे. अन्य कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेमध्ये येत असल्याने त्यांना केवळ वेळेत सूट देण्यात आलेली आहे. मात्र टायर नूतनीकरण प्रकल्प आणि विभागीय कार्यशाळेतील कर्मचारी अत्यावश्यक सेवेमध्ये येत नसतानाही त्यांना सुटी देण्यात आलेली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये नसल्याने या कर्मचाºयांना सार्वजनिक सुटी आणि साप्ताहिक सुटी घेण्याची सक्ती केली जाते दुसरीकडे मतदानाच्या दिवशी मात्र त्यांना अत्यावश्यक सेवेमध्ये कसे धरण्यात आले याविषयी कर्मचाºयांमध्ये नाराजी आहे.एसटीतील चालक आणि वाहकांना अत्यावश्यक सेवा म्हणून मतदानासाठी काही तासांची सुटी देण्यात आलेली आहे. इतर कार्यालयीन कर्मचारीदेखील सुटीवर आहे. अत्यावश्यक सेवेत नसतांनाही टायर नूतनीकरण तसेच विभागीय कार्यशाळेतील कर्मचाºयांना सुटी देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. महामंडळाच्या प्रशासकीय महाव्यस्थापकांनी या संदर्भातील प्रत्रक जाहीर करताना डेपो पातळीवर सुटी आणि कामाच्या वेळेत सवलत देण्याबाबतचे आदेश दिलेले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरच सुटीचे नियोजन करावे, अशी मागणी कर्मचाºयांकडून केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिकstate transportएसटी