शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधील सर्व मार्गांवरील एस.टी. बसेस रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 16:37 IST

भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या. सकाळच्या सत्रात काही गाड्या सोडण्यात आल्या होत्या; परंतु दुपारनंतर वातावरण चिघळल्याने आणि महामंडळाच्या दोन बसेसच्या काचा फोडण्यात आल्यामुळे सर्वच मार्गांवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली.

ठळक मुद्देदोन दिवसांत महामंडळाच्या १३ बसेसचे नुकसान, पुणे येथे शिवशाही बस पोहचू शकलेल्या नाहीत. बुधवारी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या

नाशिक बंद : दोन दिवसांत १३ गाड्यांचे नुकसाननाशिक : भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या. सकाळच्या सत्रात काही गाड्या सोडण्यात आल्या होत्या; परंतु दुपारनंतर वातावरण चिघळल्याने आणि महामंडळाच्या दोन बसेसच्या काचा फोडण्यात आल्यामुळे सर्वच मार्गांवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली. दरम्यान, कालपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे दोन दिवसांत महामंडळाच्या १३ बसेसचे नुकसान झाले आहे. दर दोन तासांनी घटनेचा आढावा घेतला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे एस.टी. महामंडळाचे कोट्यवधींचे उत्पन्न बुडाले असून, अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. राज्यातील परिस्थिती चिघळल्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यादेखील थांबविण्यात आल्या आहेत. कालपासून मुंबई, पुणे येथे शिवशाही बस पोहचू शकलेल्या नाहीत. बुधवारी पुकारण्यात आलेल्या बंदमुळे तर सकाळपासून लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यात आलेल्या नाहीत. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बससेवाही तूर्तास थांबविण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकहून मालेगाव, मनमाड, सटाणा, लासलगाव, येवला, सिन्नर, पिंपळगाव, नांदगाव, पेठ, कळवण, इगतपुरीकडे होणारी वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात आली आहे. नाशिकहून बस सोडली जात नाहीच, शिवाय कालपासून परतीच्या गाड्याही आहे तेथेच थांबविण्यात आल्या आहेत.राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने शिवशाही बसेस पूर्णपणे रद्द करण्याचे कालच आदेशित केले होते. त्यामुळे राज्यातील सर्वच शिवशाही बसेस रद्द करण्यात आल्या होत्या. लाल पिवळ्या गाड्या काही प्रमाणात सुरू ठेवण्यात आल्या; मात्र राज्यात अनेक ठिकाणी बसेसवर हल्ला झाल्याने या बसेसही बंद करण्यात आल्या आहेत. त्यातच महाराष्टÑ बंदची हाक दिल्याने बुधवारी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. मंगळवारी जिल्ह्यात ११ गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या, तर बुधवारी दोन बसेस फोडण्यात आल्यामुळे नुकसानग्रस्त बसची संख्या १३ इतकी झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकstate transportराज्य परीवहन महामंडळ