शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
3
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
4
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
5
धक्कादायक..! नात्यातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
6
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
7
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
8
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
9
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
10
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
11
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
12
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
13
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
14
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
15
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
16
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
17
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
18
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
19
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
20
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!

राज्य ग्राहक आयोगाच्या जिल्हा ग्राहक मंच अध्यक्ष, सदस्य परीक्षेचा निकाल जाहीर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 18:46 IST

नाशिक : राज्य ग्राहक आयोगातर्फे २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या जिल्हा ग्राहक मंच अध्यक्ष व सदस्य पद परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि़१५) सायंकाळी जाहीर करण्यात आला़ अध्यक्षपदाच्या परीक्षेत नाशिक जिल्हा न्यायालयातील अ‍ॅड़ मिलिंद महादू निकम (रा़अभिषेक विहार ,म्हसरूळ) हे राज्यात द्वितीय आले असून सदस्य पदासाठीच्या परीक्षेत नाशिकच्या पूनम विजयकुमार महर्षी या सातव्या ...

ठळक मुद्देनाशिकचे मिलिंद निकम राज्यात द्वितीय : सदस्यपदी पूनम महर्षी सातव्या

नाशिक : राज्य ग्राहक आयोगातर्फे २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या जिल्हा ग्राहक मंच अध्यक्ष व सदस्य पद परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि़१५) सायंकाळी जाहीर करण्यात आला़ अध्यक्षपदाच्या परीक्षेत नाशिक जिल्हा न्यायालयातील अ‍ॅड़ मिलिंद महादू निकम (रा़अभिषेक विहार ,म्हसरूळ) हे राज्यात द्वितीय आले असून सदस्य पदासाठीच्या परीक्षेत नाशिकच्या पूनम विजयकुमार महर्षी या सातव्या आल्या आहेत़

राज्य ग्राहक आयोगाने जुलै २०१७ मध्ये जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच अध्यक्षांच्या चार तर तर सदस्यपदाच्या २४ जागांसाठी जाहिरात काढली होती़ या परीक्षेसाठी राज्यभरातील हजारो वकीलांनी अर्ज भरून परीक्षा दिली होती़ अध्यक्षपदासाठीच्या चार जागांसाठी झालेल्या परीक्षेत केवळ १४९ परीक्षार्थीं पास झाले त्यापैकी गुणवत्ता यादीनुसार चौघांची निवड करण्यात आली असून अ‍ॅड़ मिलिंद निकम यांनी राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला आहे़ निकम हे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी) पदाची परीक्षा पास झालेले असून त्यांची निवडही झालेली आहे़ जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्षपद हे जिल्हा न्यायाधीशांच्या समकक्ष आहे़

राज्य ग्राहक आयोगाने जिल्हा तक्रार निवारण मंच सदस्यपदाच्या २८ जागांसाठी जाहीरात काढली होती़ त्यामध्ये राज्यभरातून बसलेल्या हजारो वकीलांपैकी केवळ २४४ पास झाले त्यापैकी गुणवत्ता यादीनुसार २४ जणांची निवड करण्यात आली अ‍ॅड़ पूनम महर्षी या राज्यात सातव्या आल्या आहेत़ राज्यातील बहुतांशी ग्राहक तक्रार निवारण मंचमधील रिक्त पदांमुळे कामकाज ठप्प झाले होते़ मात्र, आता परीक्षेचा निकाल लागल्याने या पदांवरील नियुक्त्यानंतर ग्राहक न्यायालयाचे कामकाज सुरळीत होण्यास मदत होणार आहे़

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालयexamपरीक्षा