शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

‘दर्पण’ सुविधेमुळ े ग्रामीण टपाल यंत्रणेला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 17:03 IST

नाशिक : खेड्यापाड्यापर्यंत पोहचलेल्या टपाल विभागाने आपली यंत्रणा आॅनलाइन करण्याबरोबरच ग्रामीण भागातील सेवाही डिजिटल केली आहे. त्यानुसार वर्षभरापूर्वी ‘आरआईसीटी’ ...

ठळक मुद्देयोजनेची वर्षपूर्ती: आॅनलाइनमुळे ग्राहकांचा वाढला सहभाग

नाशिक : खेड्यापाड्यापर्यंत पोहचलेल्या टपाल विभागाने आपली यंत्रणा आॅनलाइन करण्याबरोबरच ग्रामीण भागातील सेवाही डिजिटल केली आहे. त्यानुसार वर्षभरापूर्वी ‘आरआईसीटी’ उपक्रमांतर्गत सुरू केलेल्या ‘दर्पण’ योजनेमुळे ग्रामीण भागातील टपाल सुविधेला गती मिळाली असून, खातेदारांची संख्या दुपटीने देवाण-घेवाणीच्या व्यवहाराला चालना मिळाली, अशी माहिती प्रवर डाकपाल एम. एस. अहिरराव यांनी दिली.‘द रुरल इन्फॉरमेशन अ‍ॅण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी’ अंतर्गत ‘डिजिटल अ‍ॅडव्हान्समेंट आॅफ रुरल पोस्ट आॅफिस फॉर न्यू इंडिया’ अर्थात दर्पण उपक्रमांर्गत ग्रामीण भागातील टपाल सुविधेला गती देण्याचा कार्यक्रम वर्षभरापूर्वी हाती घेण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यातील २६७ ग्रामीण टपाल कार्यालयांमध्ये शाखा डाकपाल यांच्या माध्यमातून डिजिटल टपाल सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे ग्राहकांचे परालंबित्व कमी होऊन नवीन खाते उघड्यापासूत ते आर्थिक देवाण-घेवणाची कामे लागलीच होऊ लागल्याने ग्राहकांचा या यंत्रणेवरील विश्वास वाढल्याचे ग्राहकांच्या संख्येवरून दिसून आले आहे.आर्थिक देवाणघेवाणीच्या कामाला यापूर्वी विलंब लागत होता. शाखा कार्यालय ते तालुका टपाल कार्यालयापर्यंतचा प्रवास, मंजुरी आणि पुन्हा त्याच मार्गाने ग्राहकांपर्यंत पोहचण्याचा कालावधी मोठा होता. परंतु आता एका दिवसात आर्थिक व्यवहार होऊ लागले आहेत तर काही मिनिटांमध्ये खाते सुरू करता येत असल्यामुळे या व्यवस्थेमुळे ग्राहकही टपाल विभागाकडे आकर्षित झाले आहेत, अशी माहिती सहायक अधीक्षक पंकज कुलकर्णी यांनी दिली.

टॅग्स :NashikनाशिकPost Officeपोस्ट ऑफिस