शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटी विभागीय कार्यालयात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 19:09 IST

पंचवटी : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे पंचवटी विभागीय मनपा कार्यालयातील कामकाजावर परिणाम जाणवत आहे. आचारसंहिते कामे नसल्याने आणि ...

ठळक मुद्देअधिकारी निवांत: कामकाज नसल्याने सर्वत्र शांतता

पंचवटी : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे पंचवटी विभागीय मनपा कार्यालयातील कामकाजावर परिणाम जाणवत आहे. आचारसंहिते कामे नसल्याने आणि काही कर्मचारी निवडणूक प्रशिक्षणासाठी असल्यामुळे कार्यालयात शुकशुकाट पसरल्यचे चित्र आहे.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहिर झाल्यापासून लोकप्रतिनिधींनी कार्यालयात येण्याचे टाळले आहे. त्यामुळे नियमित कामकाजावर देखील परिणाम जाणवत आहे. पंचवटीतील सर्वच लोकप्रतिनिधींनी महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयाकडे पाठ फिरवल्याने पंचवटी विभागीय कार्यालयात सर्वच विभागात शांतता पसरली आहे.आचारसंहिता असल्याने का होईना अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींच्या आदेशापासून काहीकाळ मोकळीक मिळाली आहे. अनेकांनी कामाचा ताण हलके झाल्याचेही सांगितले. दुसरीकडे संबंधित विभागाचे अधिकारी मात्र आचारसंहितेचे कारण पुढे करीत सर्वसामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींचे देखील फोन उचलत नसल्याने लोकप्रतिनिधींची देखील अडचण होत असल्याची तक्र ार होत आहे. एरवी अनेक छोटेमोठे प्रश्न घेऊन पालिकेत येणºया नगरसेवकांची संख्या कमी झाली आहे. आचारसंहिता असल्यामुळे लोकप्रतिनिधींचे कक्ष बंद करण्यात आले आहेत. सभाही होत नसल्याने पालिकेकडे कुणीही फिरकतांना दिसत नाही.एकीकडे आचारसंहिता जारी झाली असली तरी दुसरीकडे मात्र मनपा कार्यालयातील काही अधिखऱ्यांना मोकळीक मिळत आहे; तर काहींना महापालिकेचे दैनंदिन काम करून लोकसभा निवडणुकीचे काम देखील करावे लागत आहे. त्यामुळे सध्यातरी लोकप्रतिनिधींना प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी अडचण निर्माण झाल्याचे चित्र आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका