शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

शालेय विद्यार्थ्यांनी घेतली मांजा न वापरण्याची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 19:45 IST

नाशिक : राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या वतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला असून, नाशिक शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना साधा दोरा व कागदी पतंगांचे वाटप करून करण्यात आले. यावेळी नायलॉन दोरा न वापरण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या वतीने नायलॉन मांजाच्या विरोधात दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळांमध्ये मोहीम राबविण्यात आली. नायलॉन मांजाच्या ...

ठळक मुद्देदरवर्षीप्रमाणे यंदाही शाळांमध्ये मोहीम राबविण्यात आली नायलॉन मांजाच्या वापरामुळे अनेक अपघात

नाशिक : राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या वतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला असून, नाशिक शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना साधा दोरा व कागदी पतंगांचे वाटप करून करण्यात आले. यावेळी नायलॉन दोरा न वापरण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या वतीने नायलॉन मांजाच्या विरोधात दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळांमध्ये मोहीम राबविण्यात आली. नायलॉन मांजाच्या वापरामुळे अनेक अपघात होऊन नागरिक तसेच पक्षी जखमी होतात यात काहींना आपला जीवदेखील गमवावा लागला आहे.मांजामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर न करता साध्या दोऱ्याचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी युवक पदाधिकाऱ्यांनी  शालेय विद्यार्थ्यांना पतंगाचा साधा दोरा व कागदी पतंगाचे वाटप केले. नायलॉन मांजाच्या वापरावर सर्वोच्च न्यायालयानेच बंदी केली आहे. तरीही शहरात छुप्या पद्धतीने याची विक्री केली जात आहे. हा नायलॉन मांजा विकत घेतलाच नाही तर त्याची विक्री थांबेल याकरिता जनजागृतीची गरज असून, त्याची सुरुवात शालेय मुलांपासून करण्यात आली.पतंग उडविताना नायलॉन मांजाच्या वापरामुळे अनेक अपघात होतात यामध्ये अनेक पक्ष्यांना जीवदेखील गमवावा लागला आहे. त्याचबरोबर पक्षांनादेखील याचा मोठा त्रास होतो. अनेक पक्षी यात जखमी होतात तसेच त्यात त्यांचे प्राणदेखील जातात. त्यामुळे जनजागृती केली जात आहे. यावेळी शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांसह चिन्मय गाढे, भूषण गायकवाड, मितेश राठोड, संदीप खैरै, रोहित जाधव आदी.

टॅग्स :Nashikनाशिक