शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अखेरच्या दिवशी आठवले शाळेचे दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 20:46 IST

गेल्या १ मार्चपासून सुरू झालेली इयत्ता दहावीची परीक्षा गुरुवार, दि. २३ रोजी संपल्याने विद्यार्थ्यांनी ऐकमेकांची गळाभेट घेत आनंद व्यक्त केला. शालेय जीवनातील अखेरचा दिवस विद्यार्थी आणि पालकांनाही आठवला आणि सारेच शाळेच्या जुन्या आठवणीत रमले. कुठे गुरूजन आपल्या विद्यार्थ्यांना भेटायला परीक्षा केंद्रांवर आले होते, तर काही विद्यार्थिनींचे डोळे पाणावल्याचे चित्र परीक्षा केंद्रांवर दिसत होते.

ठळक मुद्देदहावीची परीक्षा : पाणावलेले डोळे अन् गळाभेटसारेच झाले भावूक, पालकही हळहळले

नाशिक : गेल्या १ मार्चपासून सुरू झालेली इयत्ता दहावीची परीक्षा गुरुवार, दि. २३ रोजी संपल्याने विद्यार्थ्यांनी ऐकमेकांची गळाभेट घेत आनंद व्यक्त केला. शालेय जीवनातील अखेरचा दिवस विद्यार्थी आणि पालकांनाही आठवला आणि सारेच शाळेच्या जुन्या आठवणीत रमले. कुठे गुरूजन आपल्या विद्यार्थ्यांना भेटायला परीक्षा केंद्रांवर आले होते, तर काही विद्यार्थिनींचे डोळे पाणावल्याचे चित्र परीक्षा केंद्रांवर दिसत होते.विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनाला कलाटणी देणारी दहावीची परीक्षा विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठीही तितकीच महत्त्वाची असते. गुरुवारी दहावीचा अखेरचा पेपर संपला आणि विद्यार्थ्यांनी एकमेकांना निकालासाठी आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. एकीकडे दहावीची परीक्षा सुरळीत पार पडल्याचा आनंद असताना दुसरीकडे शालेय आयुष्याचा उंबरठा ओलांडल्याचे दु:खदेखील व्यक्त करण्यात आले. विशेषत: पालक अधिक भावुक झाले होते. डोळ्यासमोर पहिलीत घातलेली मुले आज दहावीची परीक्षा देऊन बाहेर पडल्याने त्यांच्यासमोर आपल्या पाल्याचा शालेय जीवनातील पटच उभा राहिला.शहरातील अनेक परीक्षा केंद्रांवर शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी आले होते. परीक्षा संपून विद्यार्थी बाहेर येताच विद्यार्थी शिक्षकांपुढे झुकले आणि चरणस्पर्श करीत त्यांचा निरोप घेतला. या भावुकप्रसंगी अनेक शिक्षिकांचे डोळेदेखील पाणावले, तर शाळेतील अनेक मैत्रिणींनी साश्रू नयनांनी एकमेकींना निरोप दिला. निरोपाचा हा भावनिक खेळ एकीकडे सुरू असताना जवळच्याच स्नॅक्स, ज्युस दुकानांसमोर छोटेखानी पार्टी करून काहींनी आनंदोत्सवदेखील साजरा केला.परीक्षा केंद्रातून विद्यार्थी बाहेर आल्यानंतर शाळेच्या आवारातच परीक्षेचा अखेरच्या दिवशी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आनंद व्यक्त करीत एकमेकांचे अभिनंदन केले. पालकही मोठ्या संख्येने परीक्षा केंद्राबाहेर उभे होते. विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचीही इतर पालकांबरोबर यापुढे भेट होणार की नाही म्हणून तेही एकमेकांना पुन्हा भेटण्याचे आश्वासन देत हस्तांदोलन करीत गळाभेट घेत होते. शाळेच्या आवारात अशाप्रकारचा स्नेहसोहळा अनेक ठिकाणी दिसून आला. परीक्षेनंतरही बराच वेळ गर्दी असल्याने काही शाळांना ध्वनिक्षेपकावर शाळेचे आवार सोडण्याचे आवाहन करावे लागले.--कोट--शाळेला आणि गणवेशालाही अलविदागेल्या दहा वर्षांपासून आम्ही शाळेचा गणवेश परिधान करीत होतो. आज या गणवेशाचादेखील अखेरचा दिवस आहे. शाळा सुटली, गणवेशही सुटला, उद्यापासून शाळेचा गणवेश परिधान करता येणार नाही. परंतु शाळेची आठवण म्हणून गणवेश जपून ठेवणार आहे.- साक्षी सोनवणे, विद्यार्थिनी

 

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा