शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककरांचे ‘थ्री डी वॉकेथॉन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 01:23 IST

ख्यातनाम विचारवंत दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मधुमेह मुक्ती आणि वेटलॉस मोहीम चालविणाऱ्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये ‘थ्री डी वॉकेथॉन’च्या माध्यमातून रविवारी (दि.१५) सकाळी ७ ते १० वाजेदरम्यान हजारो नाशिककरांनी रस्त्यावर उतरून पाच किलोमीटर चालण्याचा व्यायाम केला.

ठळक मुद्देजगन्नाथ दीक्षित यांनी दिला आरोग्याचा मंत्र जिचकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त पायी चालून कृतज्ञता

नाशिक : ख्यातनाम विचारवंत दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मधुमेह मुक्ती आणि वेटलॉस मोहीम चालविणाऱ्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये ‘थ्री डी वॉकेथॉन’च्या माध्यमातून रविवारी (दि.१५) सकाळी ७ ते १० वाजेदरम्यान हजारो नाशिककरांनी रस्त्यावर उतरून पाच किलोमीटर चालण्याचा व्यायाम केला. असोसिएशन आॅफ डायबेटिस अ‍ॅण्ड आॅबेसिटी रिव्हर्सल (अ‍ॅडोर)तर्फे लठ्ठपणा व मधुमेह मुक्तीचा संदेश विश्वभरात पोहोचविण्यासाठी या ‘थ्री डी वॉकेथॉन’चे आयोजन करण्यात आले होते.लठ्ठपणा आणि मधुमेहाने ग्रासलेल्या रुग्णांसाठी दररोज चालणे हा उत्तम व्यायाम असून, शरीर निरोगी राहण्यास त्याची मदत होते. तसेच विविध आजारांपासूनही मुक्ती मिळते, त्यासाठी ‘लठ्ठपणा व मधुमेह मुक्त विश्व’ मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करीत डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्यासह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, डॉ. अजित कुमठेकर, डॉ. नितीन घैसास, डॉ. अजित मराठे आयमाचे अध्यक्ष डॉ. प्रशात देवरे यांच्या हस्ते यांनी रविवार (दि. १५) इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक येथून वॉकेथानला झेंडा दाखवून सुरुवात झाली. पुढे साईनाथनगर चौफुली, बापू बंगला, सावरकर चौक, राजे छत्रपती चौक, सार्थकनगर बस थांबामार्गे गुरुगोविंद सिंग महाविद्यालयापर्यंत हजारो नाशिककरांनी पायी चालण्याचा व्यायाम करीत वॉकेथॉनमध्ये सहभाग नोंदविला. जगभरात वीस देशांमधील १९४ शहरांमध्ये वॉकेथॉनच्या माध्यामातून सुमारे ५० हजारांहून अधिक नागरिकांनी सुदृढ आरोग्यासाठी सहभाग नोंदविल्याचे त्यांनी सांगितले. भारतात नाशिकसह दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, गोवा, बेळगाव, औरंगाबाद, गडचिरोली, फलटण, कराडसह नांदुरा यांसारख्या गाव खेड्यांच्या ठिकाणीही हजारो नागरिकांनी वॉकेथॉनमध्ये चालण्याचा व्यायाम केल्याचे डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, या वॉकेथॉनमध्ये सहभागी होणाºया सर्वांनीच आपले आयुष्य निरोगी आणि सुदृढ राखण्यासाठी दोन वेळा जेवण आणि ४५ मिनिटांत साडेचार किलोमीटर चालण्याचा व्यायाम ही आपली जीवनशैली बनविण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी रत्ना अष्टेकर, अनिरुद्ध अथनी, डॉ, श्याम अष्टेकर, अ‍ॅडोर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त संदीप सोनवणे, संजय बरसे आदी उपस्थित होते.सहभागी नागरिकांना प्रमाणपत्रथ्री डी वॉकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या सर्व नागरिकांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या प्रमाणपत्रावर मागच्या बाजूला ‘लठ्ठपणा आणि मधुमेहमुक्ती’ मोहिमेत सहभागी होण्याची प्रक्रिया विशद करण्यात आली आहे. या माध्यमातून नागरिकांनी आपला लठ्ठपणा कमी करण्यासाठी, मधुमेह मुक्तीसाठी ‘लठ्ठपणा आणि मधुमेहमुक्त विश्व’ मोहिमेचा प्रचार आणि प्रसार करण्याचा उद्देश असल्याचे डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी सांगितले. लठ्ठपणा आणि मुधमेहाने ग्रासलेल्या रुग्णांसाठी दररोज चालणे हा उत्तम व्यायाम असून, शरीर निरोगी राहण्यास त्याची मदत होते. तसेच विविध आजारांपासूनही मुक्ती मिळते, त्यासाठी ‘लठ्ठपणा व मधुमेह मुक्त विश्व’ मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहनही डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी यावेळी केले.

टॅग्स :NashikनाशिकYogaयोगFitness Tipsफिटनेस टिप्स