शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राज विसरेनात नाशिकची सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 00:57 IST

राज ठाकरे यांची नाशिकमधील सत्ता जाऊन दोन वर्षे झाली. सत्ता जाताना मनसेचे नगरसेवक देखील पक्षांतर करून गेले आणि पूर्ण बहुमताने भाजपची सत्ता आली; परंतु राज यांच्या मनातून नाशकातील पहिली सत्ता मात्र विस्मरणात जात नसून त्यामुळेच मुंबईत सध्या होत असलेल्या सभांमध्ये नाशिकमधीलच उदाहरणे ते देत आहेत.

ठळक मुद्देमुंबईतील सभेत संदर्भ : ‘लाव रे तो व्हिडीओ’ बंद!

नाशिक : राज ठाकरे यांची नाशिकमधील सत्ता जाऊन दोन वर्षे झाली. सत्ता जाताना मनसेचे नगरसेवक देखील पक्षांतर करून गेले आणि पूर्ण बहुमताने भाजपची सत्ता आली; परंतु राज यांच्या मनातून नाशकातील पहिली सत्ता मात्र विस्मरणात जात नसून त्यामुळेच मुंबईत सध्या होत असलेल्या सभांमध्ये नाशिकमधीलच उदाहरणे ते देत आहेत.लोकसभा निवडणुकीतील जाहीर सभांचे मैदान राज यांनी उमेदवार रिंगणात न आणताही गाजवले; परंतु त्याचा अपेक्षित परिणाम दिसून आला नाही. त्यानंतर निवडणूक लढवावी किंवा नाही, अशा द्विधा मन:स्थितीत असलेल्या मनसेने मुंबई, पुणे आणि नाशिक याच ठिकाणी उमेदवार देण्याची घोषणा केली. त्यानंतर ते प्रचाराच्या मैदानात उतरले असून, मुंबईत ठिकठिकाणी त्यांच्या प्रचार सभा सुरू आहेत. या सभेत मुंबईतील खड्ड्यांच्या तुलनेत नाशिकमध्ये कसे गुळगुळीत रस्ते आहेत आणि नाशिकमध्ये सत्ता असताना आपण कशी ठेकेदारांना तंबी दिली होती त्याचे ते आवर्जून उदाहरणे देत आहेत. त्यातून नाशिकची पहिली सत्ता राज हे विसरू शकत नसल्याचेदेखील स्पष्ट होते.राज यांनी शिवसेना सोडली त्यावेळी त्यांना मुंबई, पुणे आणि नाशिकमध्येच सर्वाधिक प्रतिसाद मिळाला होता. मनसे स्थापन झाल्यानंतर २००९मध्ये नाशिक शहरातून तीन आमदार मनसेचे निवडून आले होते. पाच वर्षांत मात्र पक्षाची घसरगुंडी झाली. सध्या मनसेचे पाच नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे मुंबईच्या सभेत इतकी कामे करूनही नाशिककरांनी सत्ता नाकारली, याची खंतही ते व्यक्त करतात.लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी जाहीर सभांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातील विसंगती पुराव्यानिशी दाखवण्यासाठी व्यासपीठावर व्हिडीओ दाखवण्याची पद्धत सुरू केली. त्यावेळी ‘लाव रे तो व्हिडीओ’ अशी राज यांची सूचना गाजली होती. त्याचप्रमाणे सोशल मीडिवर राज हे ट्रोल झाले होते. राज यांनीच आधी आघाडीच्या विरोधात केलेली वक्तव्ये आणि नंतर केलेले समर्थन याचे व्हिडीओही सोशल मीडियावर गाजले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत राज यांनी व्हिडीओ लावण्याचेच बंद केले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे